शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
पळसगांव :- चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा विहीरगांव या छोट्याशा गावातील राकेश नन्नावरे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे.
त्यांनी मेहनत,जिद्द, चिकाटीच्या जोरावर पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून गावाच्या लौकिकास भर घातली..
राकेश नन्नावरेंच्या घवघवीत यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांच्या वतीने त्याच्यावर गुलाल उधळून त्याचा मिरवणूकद्वारे सन्मान करण्यात आला.
काढण्यात आलेल्या सन्मान आनंदोत्सव मिरवणुकीत नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.



