गडचिरोली जिल्हाचे खेळाडू गुजरातला चमकणार…..

प्रितम जनबंधु

      संपादक 

गडचिरोली :- अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या अंतर्गत गुजरात मधील अहमदाबाद येथे दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२४ ला होणाऱ्या राष्ट्रीय NIDJAM स्पर्धेची निवड चाचणी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन व लोयडस मेटल्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने  ७ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील संजीवनी ग्राऊंड येथे सकाळी ८:३० वाजता NIDJAM च्या राष्ट्रीय निवड स्पर्धा पार पडल्या.

      ज्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यामध्ये ट्रायथलाँन A  या क्रीडाप्रकारात १४ वर्षाआतील मुलांच्या गटात विजय पैका कोवाशी तर मुलींच्या गटात भाग्यश्री किशोर मुडमा हिने प्रथम क्रमांक पटकावला  तर ट्रायथलाँन B क्रीडाप्रकारात हर्षल राकेश मोहूर्ले  तर मुलींच्या गटात प्रीती राजू गुरनुले या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तर ट्रायथलाँन C या क्रीडाप्रकारात रुद्रा रमेश भोयर तर मुलींच्या गटात जान्हवी दिनेश आकरे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तर १६ वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गणेश संतोष जायारापवार तर मुलींच्या गटात ६० मीटर धावणे स्पर्धेत रेश्मा राकेश मडावी या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तर ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निर्भय राहेंद्र सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रेश्मा राकेश मडावी हिने प्रथम क्रमांक पटकावला.

        ८० मीटर हर्डल्स धावण्याच्या स्पर्धेत गणेश संतोष जायारापवार तर उंचउडी क्रीडाप्रकारात राणी श्रीनिवास मडावी, १६ वर्षाआतील मुलांच्या गटात  लांबउडी स्पर्धेत शैलेश दयानाथ कोकेरवार याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात सानिका संजय पिरशिंगुलवार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गोळाफेक स्पर्धेत पियुष तुकाराम मडकाम याने प्रथम क्रमांक पटकावला तर भालाफेक स्पर्धेत राणी श्रीनिवास मडावी हिने प्रथम क्रमांक पटकावला व पेंटाथलाँन क्रीडा प्रकारात निर्भय राहेंद्र सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला  त्यानंतर लगेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले.

               या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मृणाली सराफ मॅडम, भूपती सर, दलसू सर, संदीप चापले, कापकर मॅडम, आयशा मॅडम, नंदूजी बांबोळे सर, सदानंद सुरणकर , महेंद्र भुरले सर, आकाश सर, गणेश सर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जुआरे यांनी केले तर आभार महेश वाढई यांनी मानले गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शन या स्पर्धेला पंच म्हणुन महेश वाढई सर राहुल जुआरे सर यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली याप्रसंगी बहुसंख्येने खेळाडु पालक वर्ग उपस्थित होते.