मनातील घान दूर झाल्याशिवाय अंधश्रध्दा जाणे अशक्य:-प्रकाश मेश्राम..(अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन, माजी सरपंच)

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका 

        मनातील घान दूर केल्याशिवाय अंधश्रद्धा जाणे अशक्य असल्याचे प्रतिपादन मौजा येरखेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर च्या वतीने सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातंर्गत पहिला दिवसाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे प्रसंगी प्रकाश मेश्राम यांनी केले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक हरिभाऊ पाथोडे तर प्रमुख अतिथी म्हणून मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रकाश मेश्राम,प्राध्यापक कार्तिक पाटील,प्राध्यापक प्रफुल्ल राजुरवाडे,प्राध्यापक कात्रज वार,प्राध्यापिका सोनटक्के मॅडम,संजय गेडाम सरपंच येरखेडा विचार मंचावर उपस्थित होते.

       राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात युवा पिढी निर्माण करण्याची ताकत आहे आणि श्रम संस्काराचे धडे यातून मिळतात असे सुध्दा प्रकाश मेश्राम यांनी म्हटले.

      प्रा.हरिभाऊ पठोडे यांनी प्रत्याक्षिक द्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा उजाळा दिला.अंधश्रद्धा दूर कशी केल्या जाईल आणि अंधश्रद्धा कशी निर्माण होते त्याचे स्पष्टीकरण करून दिले.

       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कात्रजवार सर तर आभार प्रदर्शन प्रा.राजुरवाडे सर यांनी मानले.शिबिराला महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.