जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रवीण चिमूरकर यांची निवड… — भद्रावतीतुन तिघांची सदस्य म्हणुन निवड…

    उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती 

            जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी नुकतीच ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची निवड केलेली आहे. त्यात भद्रावती येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सहसचिव प्रवीण चिमूरकर यांची ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणुन निवड करण्यात आली. सोबतच ज्ञानेश्वर डुकरे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तर दत्तात्रय गुंडावार यांची शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली.

             ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ नुसार ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदची तरतुद केली आहे. त्यानुसार ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता दि. ८ नोव्हेंबर ला निवड समिती मार्फत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकुण १७ सदस्यांची निवड करण्यात आली. 

           सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले, ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देणारे प्रवीण चिमूरकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती चे सहसचिव आहेत. पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ग्राहकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला असून, ग्राहक सेवेसाठी ते तत्पर आहेत.

            त्यांची निवड झाल्याबद्दल प्रवीण चिमुरकर यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीचे अध्यक्ष वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, सुदर्शन तनगुलवार तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे डॉ. ज्ञानेश हटवार, मनोज मोडक, आशीष कोटकर, शिरीष उगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असलेले प्रवीण चिमूरकर यांचे निवडीबद्दल अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  चौकट 

            माझ्या निवडीचे खरे श्रेय अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीचे वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे यांना जाते. त्यांनी नेहमी माझ्या पाठिशी उभे राहीले, माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे हे शक्य झाले. मी भविष्यात ग्राहकांच्या हक्क, अधिकारांसाठी सतत काम करत राहील.