ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
महाराष्ट्र पत्रकार संघाचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून साकोली येथील रहिवाशी भावेश कोटांगले यांचा कला क्षेत्रात विशेष योगदान म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडाराच्या वतीने यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते यांच्या हस्ते जिल्हा स्त्ररीय कला साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भावेश कोटांगले फुले शाहू आंबेडकर विषयावर गीत गायन करतात ते कवी, गायक, संगीतकार, प्रबोधनकार,नाट्य कलावन्त, तबलावादक सुद्धा आहेत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष , झाडीपट्टी वादक संघटना वडसा चे अध्यक्ष आहेत.
ते आपल्या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करतात, जिल्हा ,विदर्भ , राज्यस्तरीय लोककला कलावंतांचे मेळावे घेत असतात , त्यामधून सर्व स्त्ररीय कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. सामाजिक आणि धार्मिक संघटनेमध्ये सुद्धा सहभाग घेतात त्यामुळे त्यांना बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. 14 जून 2025 ला माटुंगा मुंबई येथे लोककला पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ,चित्रपट अभिनेत्री नैना कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला.
या सत्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, ,जिल्हा उपाध्यक्ष डी. रंगारी,साकोली तालुका अध्यक्ष अश्विन रंगारी, पूजा वासनिक ,शीतल नागदेवे, आकाश राऊत व परिसरातील मित्रपरिवार यांनी त्यांच्या अभिनंदन केले.



