आलापल्ली येथे शासकीय आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ… — माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन..

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

आलापल्ली:- आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित,आलापल्ली येथे मका खरेदी शासकीय आधारभूत किंमत उन्हाळी मक्का खरेदी सन 2023 अंतर्गत उन्हाळी दुय्यम हंगाम म्हणून मका खरेदी केल्या जाणार्‍या केंद्राचे उद्घाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते 9 जून रोजी करण्यात आला.

     शासकीय आधारभूत उन्हाळी मका हा शेतकऱ्यांसाठी दुय्यम पीक म्हणून मोठ्या प्रमाणात परिसरात घेतल्या जात असून याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होईल त्याकरिता शुक्रवारी मका या खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले.

       यावेळी सरपंच शंकर मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य सौ पुष्पा अलोने,नागेपल्ली ग्रा.प सदस्य मलरेड्डी येमनूरवार,लक्ष्मण येर्रावार,पराग पांढरे, आदिवासी विविध सहकारी संस्थे चे प्रतवारीकर ए सी आलम,संस्थेचे अध्यक्ष भीमराव आत्राम,सचिव एम डी गड्डमवार, गोदामपाल राजेश तकवाले,संचालक भीमय्या राजीवार,अचूबाई सडमेक, आदी उपस्थित होते.