गडचिरोली येथे वस्तीगृहासाठी इमारत भाडयाने हवी..

 

 डॉ.जगदीश वेन्नम 

   संपादक                 

  गडचिरोली,(जिमाका)दि.09: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयाचे अधिनस्त इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलाची/मुलीची शासकीय वसतीगृहासाठी गडचिरोली येथे इमारत भाडयाने घेणे आहे. 

      इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 100 विद्यार्थी संख्येस कमीत कमी 7850 चौ. फुट (मोकळे जागेसह असावे) अटी व शर्ती पुर्तता करणाऱ्या इच्छुक इमारत मालकाने दिनांक 16 जुन 2023 पर्यंत परिपुर्ण अर्ज, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली येथे इमारतीच्या संपुर्ण तपशिलासह, नकाशासह भाडे मागणीसह व इतर कागदपत्रासह बंद लिफाफ्यात सादर करावे.

       आवश्यक अटी व शर्ती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयास कार्यालयीन वेळेस संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली सचिन मडावी यांनी कळविले आहे.