राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू लागलाय….

 

   प्रदीप रामटेके

   मुख्य संपादक

       महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला फारसी ताकद अजूनही निर्माण करता आली नाही.तद्वतच चिमूर तालुक्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाममात्र ओळख..

       एखाद्या भागात ज्या पक्षाची कार्यकर्तातंर्गत व मतदारातंर्गत ताकद राहात नाही अशा पक्षात प्रवेश करुन काम करणे म्हणजे तारेवरची कसरतच असते.

           मात्र,चिमूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षीय ताकद नसताना काॅंग्रेस पक्षाचे माजी जिल्हा पदाधिकारी व भिसीचे माजी सरपंच अरविंद रेवतकर यांनी या पक्षात प्रवेश करुन अनेकांना अचंबित केले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातंर्गत स्वतःला स्वयं शिध्द करण्यासाठी मन बनविले. 

        मन तयार झाले की बाकीचे अडसर करणारे मार्ग पक्ष हितासाठी खुले करणे कर्तृत्वावर अवलंबून असते हे तितकेच खरे आहे.

       अरविंद रेवतकर यांनी अभिष्टचिंतन सोहळा स्वतःच्या गावात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चिमूर तालुक्यात रुजविण्यासाठी प्रारंभ केलाय.

         पक्षहितासाठी व पक्षबांधणीसाठी जनसंपर्क करणारी व जनसंपर्कात राहणारी कार्यपध्दत स्वतःला कार्यक्षम बनविनारी असते व स्वतःला शिध्द करणारी असते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर चांगले ओळखून आहेत.

          “बुधी बुधी पाय पसरी,असी म्हण ग्रामीण भागात चांगलीच प्रचलित आहे.या म्हणी प्रमाणे अरविंद रेवतकर पक्षाचे कार्य रेटून करीत आहेत.

        माजी राज्यमंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत संपर्क दौरा कार्यक्रम सुध्दा मौजा भिसी येथे नुकताच पार पडला.या संपर्क दौरा कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा अरविंद रेवतकर यांच्याकडे होते.त्यांनी तो पक्षनिहाय संपर्क दौरा कार्यक्रम सुध्दा कमी वेळात यशस्वी करुन दाखविला.

             पक्ष निष्ठा असली तर पक्षाचे कार्यक्रम यशस्वी करून दाखविण्यात औरच जिद व चिकाटी असते हे अरविंद रेवतकर यांनी स्व कर्तृत्वातून सध्यातरी दाखवून दिले.

        पक्ष बांधणी करताना ज्या नेतृत्वाचे मन निरपेक्ष असते त्यां मनाला यशाची खात्री असते.अरविंद रेवतकरांचे सध्या तरी मन निरपेक्ष आहे.पुढे त्यांच्या मनात व मनातंर्गत त्यांच्या विचारात काय बदल घडून येतात हे सांगता येत नाही.

        मात्र,अरविंद रेवतकर यांच्या पक्ष प्रवेश पुर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिमूर तालुक्यात ताकद क्षीण होती.सांगायचे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ नावापूरता मर्यादित होता.अरविंद रेवतकरांचे पक्ष कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुक्यात महत्व वाढू लागले आहे व पक्षाची ताकद सुध्दा वाढू लागली आहे.

        म्हणूनच कधी नव्हे एवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिमूर तालुक्यात आता ताकदीनिशी बोलू लागला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणारे नाही.