शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिड) येथे काॅक्रीट बंदिस्त नाली बांधकाम जनसुरक्षा योजना अंतर्गत मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शेंबेकर यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मौजा सावरी (बिड) गाव आठवडी बाजर पेठेसह ग्रामीण भागातील खेडेगावांचे शिक्षण केंद्र आहे.याचबरोबर या गावला भारतीय स्टेट बँक असल्याने आजुबाजूच्या खेडेगावच्या नागरिकांचे आर्थिक देवाणघेवाणचे स्थळ आहे.
गावातील व बाहेरुन आलेल्या नागरिकांना गाववातंर्गत दळणवळणाची कुठल्याही प्रकारची असुविधा होवू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शेंबेकर यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काॅंक्रीट बंदिस्त नाल्याचे बांधकाम जनसुरक्षा योजना अंतर्गत मंजूर करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनावर सरपंच लोकनाथ रामटेके यांची स्वाक्षरी आहे.



