ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा तालुक्यातील अंगारा गावात गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन व्यवहार, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय कामकाज तसेच संपर्क साधणे अशक्य बनले आहे.
या समस्येमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक वेळा नेटवर्क समस्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन सुस्त झोप घेत असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तातडीने नेटवर्क सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली असून, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.



