अखरपख अखजीतील गोस्वामी भिक्षेकऱ्यांची गाणी इतीहास जमा…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

        पारशिवनी:- एकेकाळी पित्रुमोक्ष अमावश्या न अक्षय तृतिया काळातील गोस्वामी (गोपाळ) समाजातील भिक्षेकरी व त्यांची गाण्यात येणारी गाणी ईतीहास जमा झाल्याचे अलिकडे दिसुन येते. याचाच अर्थ या समाजाने भिक्षा मागण्याचे काम कमी केले.केले असून समाज साक्षर झाल्याचे मग जाणकरांचे आहे.या भिक्षेकऱ्यांना पांगूळ किंवा वासुदेव म्हणायचे असे ते सांगायचे.

               आजपासुन १५ ते २० वर्षाआधी अखरपख (पितृमोक्ष अमावशा) अक्षय तृतिया (अखजी) या काळात गोस्वामी समाजाचे भिक्षेकरी गावागावात भिक्षा मागायचे व गाणी गायचे घरातील मृत पावलेल्यांची नावे घेवून ते गाणी गात असत या गाण्यातून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरीता प्रार्थना करायचे त्याच्या मोबदल्यात त्यांना घराघरातून धान्य दिल्या जात होते व पूर्वजांच्या नावाने दान दक्षिणा दिल्याने नागरीकांनाही समाधान वाटायचे.