पालासावळी येथे जागतिक कापूस दिनानिमित्ताने शेती शाळेचे आयोजन….     

कमलसिंह यादव 

 प्रतिनिधी 

 पारशिवनी:- दिनांक 7/10/2023 शनिवार रोजी जागतिक कापूस दिनानिमित्ताने शेतकरी बांधवांसाठी कापूस उत्पादन आणि गुलाबी बोंड अळी जागरूकता अणि व्यवस्थापन या विषयावर शेती शाळा आयोजित करण्यात आली.

       प्रमुख मार्गदर्शक म्हणून कापूस अनुसंधान केंद्र नागपूर येथील वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. मणिकंन्दन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून कृ्षी अधिकारी व गावातील सरपंच श्री. राजेंद्र ठाकुर, सिटी-सिडिआर ए चे प्रकल्प समन्वयक श्री. गोविंद वैराळे प्रामुख्याने उपस्थित राहुन शेतकरी याना मार्गदर्शन केल. प्रकल्प अधिकारी श्री जगदीश नेरलावार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

          गावातील प्रगतशील शेतकरी रमेश शहारे आणि अभय मैंद यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकर्‍यांना बोंड अळी विषयी माहिती दिली आणि कामगंध सापळे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन सिटी-सिडिआरए चे कापूस विस्तार सहायक सनी शेंडे,राहुल ढाले, सुमेध भोयर, सिद्धार्थ चांदेकर, दिनेश ताडे यांनी केले.