‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात किट वाटप… — भाग्यश्रीताई आत्राम यांचा मार्गदर्शनात दर बुधवारी सुरू आहे उपक्रम…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी:- ‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत बुधवारी (7 जून) रोजी स्तनदा माता व नवजात बाळांना पोषक आहारचे किट वाटप करण्यात आले.

         8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून ‘भाग्यश्री शिशु’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने दर बुधवार ला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दर बुधवार ला स्तनदा माता व नवजात बाळाला पोषक आहार असलेले कीट वाटप करण्यात येत आहे.

      7 जून रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्यांनी किट वाटप करून गरोदर मतांची आस्थेने विचारपूस केले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार,सरिता पारेल्लीवार,श्यामला बेझंकीवार,रजिता पारेल्लीवार आदी महिला उपस्थित होते.