चिमूर-गड़चिरोली लोकसभा निवडणुक संबंधाने आमदार तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा झंझावती दौरा.. — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागभीड शहर व ग्रामीणची आढावा बैठक संपन्न..!!

 

तालुका प्रतिनिधी

नागभिड :-

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे नागभीड नगरात प्रथम आगमन होताच विश्राम गृह येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

        नागभीड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य,महिला जिल्हा अध्यक्ष सौ.बेबीताई उइके,युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितिनभाऊ भटारकर यांच्या उपस्थितीत पार पडली…!

         तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ नेते हिराचंदजी बोरकूटे,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर,युवक प्रदेश सरचिटनिस प्रशांतभाऊ घुमे,श्री.नितिनभाऊ घुबडे,श्री गणेशभाऊ बावनें जिल्हा उपाध्यक्ष,नासिरभाई शेख उपस्थित होते ….!

       याप्रसंगी चिमूर विधानसभा अध्यक्ष श्री. रघुनाथ बोरकर,तालुका अध्यक्ष श्री.विनोदभाऊ नवघडे,शहर अध्यक्ष रियाजभाई शेख,महिला तालुका अध्यक्ष सौ.निर्मलाताई रेवतकर,महिला शहर अध्यक्ष सौ. वनिताताई सोनकुसरे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख,युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर,विधानसभा उपाध्यक्ष श्री. मंगेशभाऊ सोनकुसरे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिकभाई शेख,सेवादल तालुका अध्यक्ष श्री.रामभाऊ शहाने,ओबीसी तालुका अध्यक्ष श्री.दिनेशभाऊ समर्थ,युवक जिल्हा सरचिटनिस श्री.संदीप संदीपभाऊ डांगे,जिल्हा सचिव श्री.दिपक खोब्रागड़े,शहर उपाध्यक्ष श्रावण धारने,प्रभाग अध्यक्ष सुरेश ढोले,प्रभाग अध्यक्ष जीतू चौधरी,प्रभाग अध्यक्ष दिलीप कंकलवार,प्रभाग अध्यक्ष मोरेश्वर पाथोड़े,देवनाथ बागड़े,सौ.ठोंबरेताई,माजी तालुका अध्यक्ष मौरांडे काकाजी,नीकुरेजी,खोब्रागड़ेजी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

             माजी राज्यमंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन करताना नागभीड शहर राष्ट्रवादी कांग्रेसची प्रशंसा केली व आता लोकसभा निवडणुकीच्या तैयारीला लागा असे सांगीतले …!