राजाराम पोलिस ठाण्यात जनजागरण मेळावा संपन्न.. — शिलाई मशीनसह विविध साहित्य वितरण.. — गरीब युवक-युवती विवाहबद्ध..

रमेश बामणकर 

अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी – उप पोलीस स्टेशन राजाराम खां.च्या पाठांगणावर पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलिस अधीक्षक चिता प्रशासन,तारे सा.अप्पर पोलीसअधीक्षक अभियान,देशमुख सर अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी,सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी पोउनि साहेबराव कासबेवाड यांच्या नेतृत्वाखाली राजाराम उप पोलीस ठाण्यात भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल नागुलवार उपसरपंच ग्रा.प. गुड्डीगुडम हे होते तर उदघाटक म्हणून डॉ.सुरभी शिल्पकार प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम हे होते,प्रमुख अतिथी म्हणून सरोजा पेंदाम सरपंच गुड्डीगुडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हरिष गावडे उपसरपंच देवलमरी,अनिल पेंदाम सामाजिक कार्यकर्ते गुड्डीगुडम,सत्यम भंडारवार पोलिस पाटील,दामाजी गावडे पोलीस पाटील,आनंदराव वेलादी सामाजिक कार्यकर्ते,राजाराम चे पेसा अध्यक्ष अर्का यांनी उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून करण्यात आली.पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविले जाणाऱ्या योजनांची माहिती देऊन योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी साहेबराव कासबेवाड यांनी केले.

         डॉ.शिल्पकार यांनी येणाऱ्या पावसाळी हंगामात येणारे बिमाऱ्या व त्यावरील उपाय व स्वच्छता, घेणारे आहार व आरोग्य बाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोउनि विनायक मसाडे यांनी केले आहेत.

        या प्रसंगी राजाराम पोलीस स्टेशन हद्दीतील २५० ते ३०० महिला पुरुष उपस्थित होते.

विवाह सोहळा व साहित्य वाटप

       जनजागरण मेळाव्यात गुड्डीगुडम येथील एका गरीब परिवारातील युवक- युवती चा विवाह सोहळा पार पाडून नवं वधू-वरास शुभाशीर्वादसह शासकीय योजना अंतर्गत काही वस्तूंचा भेट म्हणून लाभ देण्यात आलाय.तसेच गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले आणि रोजगार निर्मिती करिता बेरोजगार बारा युवतींना शिलाई मशीन करून घरगुती वापरातील विविध साहित्याचे वितरण करण्यात आले आणि नागरिकांना आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून देण्यात आले.

        या वेळी नागरिकांनी राजाराम पोलिसचे कौतुक केले व आभार मानले.