जेतवन बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा साजरी…

 

 

प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी 

 

     चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहार येथे बौध्द पंच कमेटी, भीमज्योती महिला मंडळ, प्रबुद्ध युवा मंच, भीमकन्या युवती विचार मंच ह्यांचे सयुक्त विद्यमाने “बुद्ध पौर्णिमा” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातिल् मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेची रॅली काढून शांतिचा संदेश देत, बुद्ध विचारांचे बीज पेरत बुध्दम शरणंम गछामी, धम्मम शरणंम गछामी, संघम शरणंम गछामी च्या निनादाने म्हणत निघाली व विहाराचे प्रांगणात रॅली ची सांगता करण्यात आली.

 

      या प्रसंगी आयु. जगदीश रामटेके, वामन वाघमारे, आशिक रामटेके, हरिदास शेंडे, काशिनाथ गजभिये, ईश्वर बोरकर, ईश्वर ठवरे, गंगाधर गजभिये, कवडू मेश्राम, राजेंद्र गजभिये, हिरालाल गजभिये, पंकज रामटेके, प्रतिक शेंडे, योगेश मेश्राम, निलेश मेश्राम, भावना शेंडे, कुसुमताई बोरकर, आशा चव्हाण, मायाबाई गजभिये, आदी. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर खीर दान करुन कार्यक्रमाची सांगता झाली.