राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कूरखेडा तालुक्यातील मालेवाडा- येरकड मार्गावर असलेल्या धानोरा तालुक्यातील सूरसूंडी जवळ वरातीचा बोलेरो वाहनांच्या अपघातात वाहनात असलेली १ महिला ठार तर इतर १६ वर्हाडी जखमी झाल्याची घटना आज दि २५ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेचा सूमारास घडली.
धानोरा तालुक्यातील तळेगाव येथून कूरखेडा तालुक्यातील कसारी येथे आज सायंकाळी लग्नाची वरात बोलेरो या चारचाकी वाहनातून येत असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटले या अपघातात वर्हाडी असलेली बबीता गावतूरे वय ६५ रा चिचोली ही महिला ठार झाली तर रोशन ठलाल,गौतम मडावी सोनू मोहूर्ले,मिराबाई गूरनूले, शालू मोहूर्ले, जयश्री शेंडे, प्रिया गावतूरे, वंशिका गावतूरे, सूखदेव गावतूरे, शिवांश गूरनूले, देवागंणा गावतूरे ,राकेश गावतूरे, कोमल ठलाल, अविका शेंडे, सूशीला गूरनूले, शांताबाई वाटगूरे हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमीना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र काही जखमीची तब्येत गम्भीर असल्याने त्यांना पूढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे घटनेचा पंचनामा व पूढील तपास मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आदेश नाईकवाडी यांचा मार्गदर्शनात सुरु आहे.



