Home Social दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तथा पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळे...

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तथा पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळे व ब्लँकीट वाटप… — पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नव्हे तर समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा दिवस :- गणेश माळी तहसीलदार धानोरा…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तहसीलदार गणेश माळी, गट विकास अधिकारी (बीडीओ) वानखेडे यांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लँकीटचे वाटप करण्यात आले.

         या उपक्रमाचा उद्देश रुग्णांना दिलासा देणे व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणे हा होता. ग्रामीण रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, तर थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना ब्लँकीट देण्यात आले.

         यावेळी तहसीलदार व बीडीओ यांनी पत्रकारांच्या समाजातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नव्हे तर समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा दिवस असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सर्व स्तरांवरील सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

         कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. रुग्णांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

          हा उपक्रम पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजसेवेचा आदर्श ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

            यावेळी नायब तहसीलदार वलके वैद्यकीय अधिकारी सीमा गेडाम लेपसे मॅडम तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष तुफान उंदीरवाडे सचिव समीर कुरेशी उपाध्यक्ष घनश्याम माशाखेत्री भाविकदास करमनकर सुरेश क्षीरसागर अभय इंदूरकर रितेश माशाखेत्री शरीफ कुरेशी दिवाकर भोयर बंडू हरणे देवा कुणघाटकर दुर्योधन सहारे श्रावण देशपांडे ओम देशमुख रोशन कवाडकर इत्यादी उपस्थित होते.