Home Social प्राध्यापक टिकाराम धाकडे यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा संपन्न… — विध्यार्थ्यांच्या जळणघळनीत...

प्राध्यापक टिकाराम धाकडे यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा संपन्न… — विध्यार्थ्यांच्या जळणघळनीत मोलाचा वाटा – प्राचार्य डॉ.उदय थुल…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्याल धानोरा येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ प्राध्यापक टिकाराम धाकडे हे आपल्या 25 वर्ष प्रदीर्घ, निष्ठावंत आणि विद्यार्थीकेंद्री सेवेनंतर दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले.

         त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयात सन्मान व सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

             या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय थुल होते तर प्रमुख पाहुणे डॉ.राजू किरमिरे डॉ.विना जंबेवार टिकाराम धाकडे त्यांच्या अर्धांगिनी सौ.दिक्षा धाकडे मुलगी अनुश्री धाकडे प्रा निवेदिता वटक मॅडम मंचावर उपस्थित होते.

        महाविद्यालयातील प्राध्यापकानी धाकडे सर यांच्याविषयी आपले अनुभव व्यक्त करताना काही काळ सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य यांनी धाकडे सर हे विध्यार्थ्यांच्या जडणघळनीत त्यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन केले.

        प्राध्यापक टिकाराम धाकडे यांनी आपल्या सेवाकाळात अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान दिले. शिस्त, प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि मार्गदर्शक स्वभावामुळे ते विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

        या प्रसंगी सहकारी प्राध्यापकांनी आपल्या मनोगतात धाकडे सरांच्या कार्याची, आठवणींची आणि मार्गदर्शनाची भावना व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

         आपल्या मनोगतात प्राध्यापक टिकाराम धाकडे यांनी महाविद्यालय, सहकारी, विद्यार्थी व प्रशासनाचे मनापासून आभार मानले आणि पुढील काळातही शिक्षण क्षेत्राशी आपले नाते कायम ठेवण्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे संचालन प्रा कैलास खोब्रागडे यांनी केले तर प्रस्तविक प्रा.वसंत आवारी तर आभार प्रा.विराग रणदिवे यांनी मानले.