जे एस पी एम महाविद्यालयात शिक्षण यात्रा कार्यक्रम संपन्न.. 

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

       शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण जत्रा कार्यक्रम जेएसपीएम महाविद्यालय धानोरा येथे आयोजित करण्यात आला होता.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंकज चव्हाण हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एड. दीपक चटप हे जागतिक प्रतिष्ठेचा चेव्हनिंग गोल्ड व्हॉलेंटियर पुरस्कार विजेता चेव्हनिंग स्कॉलर्स सोएस विद्यापीठ लंडन (युके)हे होते.

          प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पोईनकर मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो कवी मुक्त पत्रकार युवा सामाजिक कार्यकर्ता,प्रा.डॉ.नरूले सर,प्रतीक पानघाटे मंचावर उपस्थित होते.

          संविधान दिन ते गणतंत्र दिन 26 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2023 पर्यंत हा संवाद शिक्षण यात्रा कार्यक्रम चालणार आहे.”शिक्षणानं कोणाच भलं झालं,”शिकून काय करशील,”कशाला शिक्षण घेते,” आत्ता माझ्या कडे शिक्षणासाठी पैसे नाही,असे वाक्य आपल्याला ऐकाला मिळतात.

         पण,खरंच शिक्षण न घेतल्याने काही फरक पडते काय?होय फरक पडते.शिक्षणनी तुम्हाला जग ओळखतो,उदाहरणं म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. आंबेडकर आहेत.ते शिक्षणानी माणूस कसा मोठा होते हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकण्या सारखे आहे.

       या कार्यक्रमांतर्गत सांगण्यात आले की,विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशाची गरज नसून विविध संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप फेलोशिपच्या माध्यमातून आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येते.

             गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल विद्यार्थ्यी उच्च शिक्षण घेऊ शकतात,त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे,असे मत एड.दीपक चटक यांनी व्यक्त केले.

            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एड. दीपक चटक हे पुढे म्हणाले की,मी चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातून प्राथमिक शिक्षक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी 45 लाख रूपयांची व्यवस्था विद्यापीठांतर्गत लंडन स्कॉलरशिप मिळवून केली होती व उच्च शिक्षण घेतले होते.मी एका खेड्यातील विद्यार्थी विदेशातून आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतो तर माझ्यासारखे गोरगरीब विद्यार्थी सुद्धा स्कॉलरशिप व फेलोशिपच्या माध्यमातून उच्च शिक्षण पूर्ण करून इतरांत आपला आदर्श निर्माण करू शकतात,त्यासाठी त्यांना आपल्या जिद्दीची,परिश्रमाची गरज आहे.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी केले तर संचालन प्राध्यापक कैलास खोब्रागडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.आवारी सर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ. लांजेवार सर,प्राध्यापक डॉ. प्रवीण गोहणे सर,प्रा.भाविकदास करमनकर सर,प्रा संजय मांडवगडे,प्राध्यापिका निवेदिता वटक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.