जे एस पी एम महाविद्यालयात जगविख्यात प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

        श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली संचालित श्री.जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा येथे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक टिकाराम धाकडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका निवेदिता वटक,,प्राध्यापक कैलाश खोब्रागडे,प्राध्यापक भावीकदास करमनकर मंचावर उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरुवात बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली.

         मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे सर्व समाजातील तळागाळातील लोकांना प्रेरणा देणारे आहेत,त्यांनी दिलेल्या संविधानातून सर्वांचे हक्क व कर्तव्य यांची जाणीव सर्व नागरिकांना असावी असे अध्यक्ष भाषणातून प्रा टिकाराम धाकडे यांनी सांगितले.

        यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वसंत चुदरी,गणेश लांबट,भास्कर कायते,सजन पवार मॅडम,बालाजी राजगडे तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास खोब्रागडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन केल्यानंतर आभार प्रदर्शन प्रा. वसंत आवारी यांनी मानले.