निमगाव येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.. 

भाविक करमनकर

 तालुका प्रतिनिधी धानोरा..

       धानोरा तालुक्यातील मौजा निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयात ६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न,बोधिसत्त्व,माहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

          या वेळी अध्यक्ष म्हणून दिवाकर भोयर सहाय्यक शिक्षक निमगांव,प्रमुख अतिथी म्हणून कुमारी भारती श्रीरामे,विलास नाकतोडे,मधुकर शिवणकर,बबलु गेडाम,भुवनेश्वर गजबे,ज्ञानेश्वर लोहारे आदि मान्यवर उपस्थित‌ होते. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप नागदेवते यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.