महामानव युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण…

अनिलकुमार एन.ठवरे

     जिल्हा प्रतिनिधी

      दखल न्युज भारत

देलनवाडी :- ज्या महापुरूषाने तळागळातील दुत्करलेल्या लोकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि लेखणीच्या बळावर सर्वांना समान न्याय व अधिकार मिळवून दिले.

         असे युगप्रवर्तक विश्र्वभूषण महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक देलनवाडी येथे निळा ध्वज अर्ध्यावर उतरवून व त्रिशरण पंचशील ग्रहण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

      या प्रसंगी गावातील समस्त समाज बांधव,प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होत्या.