अखेर “त्यांची” भविष्यवाणी ठरली खरी; अमरावतीचे खासदार बनले बळवंत वानखडे… — दिनेश बुब यांच्या उमेदवारीचा नवनित राणा यांना फटका बसणार असल्याचे भाकीतही खरे ठरले…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

            देशातील लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल नुकताच घोषित झाला.यामध्ये देशात लागलेल्या निकालात व मतदान प्रक्रिया नंतर राजकीय विश्लेषक,सोशल मीडिया,राजकीय नेते कार्यकर्ते, सट्टा बाजार, पत्रकार, न्युज मीडिया यामी आपआपले मत मांडत कोण विजयी होणार याचे दाव,प्रतिदावे एक्झिट पोलच्या माध्यमातून केले होते.

            पण सदर एक्झिट पोल मोठ्या प्रमाणावर खोटे ठरण्याचे दिसून आले.पण अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २६ एप्रिल रोजी पार पडल्या नंतर दर्यापूर येथील रहिवासी,उच्च शिक्षित व्यक्तिमत्व,सूप्रसिद्ध वास्तूविशारद व न्यूमरालॉजिस्ट योगेश पनपालिया यांनी सुद्धा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल करत आपली अमरावती लोकसभा निवडणूक संदर्भात भविष्यवाणी केली होती.

           त्यांच्या या भविष्यवाणीचे अनेकांनी समर्थन तर काहींनी टीका केली होती.पण आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी एका कामधेनू मशीन यंत्राचा वापर करून केलेली भविष्यवाणी अखेर खरी ठरली असून महाविकास आघाडीचे उमेदवार दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या करीता १०० टक्के विजयी होणार असल्याचे सूचक त्यांच्या यंत्राने दिले होते ते आता सत्यात उतरले आहे.

             तसेच या निवडणुकीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या उमेदवारीचा १०० टक्के फटका महायुतीचे उमेदवार खा.नवनीत राणा यांना बसणार असल्याचे सुद्धा सूचक त्या यंत्राने दिले होते,ते सुध्दा खरे ठरले आहे.

           त्यांच्या या भविष्यवाणीची सर्वत्र चर्चा होत असून अमरावती सोबतच यवतमाळ,नागपूर,वर्धा व नगर या मतदारसंघातील भविष्यवानी सुद्धा त्यांची खरी ठरली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.