युवासेनेकडून महाविकास आघाडीचे नवनियुक्त खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

         अमरावती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत बसवंत वानखडे यांचा लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाला.

            त्या निमित्ताने नवनियुक्त खासदार यांचा युवासेना पदाधिकारी यांनी शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

          यावेळी नवनियुक्त खासदार बळवंत वानखडे यांनी असे मत व्यक्त केले की युवासेनेने खरोखर एकजुटीने मेहनत घेऊन काम केले आणि हा विजय आपला सर्वांचा आहे असे उद्गार यावेळी नवनियुक्त खासदार यांनी व्यक्त केले.

          यावेळी जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, उपजिल्हाप्रमुख सागर पाटील वडतकर, दर्यापूर तालुका प्रमुख सागर गिरे, विधानसभा समन्वयक पंकज राणे, दर्यापूर शहर प्रमुख रोहित बायस्कर, तालुका समन्वयक भरत गावंडे, रुपेश मोरे, आशिष लायडे तसेच युवासैनिक उपस्थित होते.