भिसी येथे कुस्ती दंगलीचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न.. — विविध ठिकाणच्या 45 मुली व 57 मुलांनी घेतला सहभाग… — हनुमान व्यायाम मंडळ भिसी व डॉ.सतीश वारजूकर मित्र परिवाराचे संयुक्त आयोजन..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका 

भिसी:- हनुमान व्यायाम मंडळ भिसी व डॉ. सतीश वारजूकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती दंगल 3 व 4 फेब्रुवारीला श्री विठ्ठल रुखमाई देवस्थानाच्या आखाड्यात संपन्न झाली. 

        या दंगलीतील विजेत्या कुस्तीविरांचा गौरव करणारा बक्षीस वितरण सोहळा 4 फेब्रुवारीला रात्री 10.00 वाजता थाटात संपन्न झाला. 

        बक्षीस वितरण सोहळ्याला प्रामुख्याने गणेश कोहळे ( वरिष्ठ उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद पुणे ),हरीहर भावळकर ( संघटक – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद पुणे ), रामदास सहारे ( कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद पुणे ),शरद टेकुलवार ( अध्यक्ष – चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ ), मुरलीधर टेकुलवार ( सदस्य – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे ), विनोद दिवटे ( सदस्य – चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ ), राष्ट्रीय पंच मुकेश पांडे, उमेश बडवाईक, राज्यस्तरीय पंच केशव डंभारे, अशोक बन्सोड,कविता घोरमोडे, ग्रामविश्व् संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष इंजि. गजेंद्र चाचरकर,भिसीचे माजी सरपंच अरविंद रेवतकर,माजी जि.प.सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य विजय घरत,गुरुदेव ग्रा.बँक चिमुरचे शाखा व्यवस्थापक राजू डहारे,सचिन गाडीवार,प्रदीप कामडी,कादर शेख,रामचंद्र दिघोरे,मणिराम डहारे,आनंद भीमटे,मनोज डोंगरे,दिपक आडकीने,कृष्णा तेजने,इंजि. दिनेश डुकरे,राजू भीमटे व अनेक उपस्थित होते.

           वरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कुस्ती दंगलीत विजयी झालेले खेळाडू :-

पुरुष गट :-

५० किलो वजन गट

— प्रथम बक्षीस – ३००१/-

      मयुर चौधरी,भंडारा..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

    आदित्य बावनकुळे,ब्रम्हपुरी.

— तृतीय बक्षीस – १००१/-

     तन्मय कुर्जेकर,ब्रम्हपुरी..

***

५५ किलो वजन गट :-

— प्रथम बक्षीस – ३००१/-

    अतुल चौधरी,भंडारा..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

     हर्षल खोंड,भंडारा..

— तृतीय बक्षीस – १००१/-

    रितीक आंबोने,नागपूर..

**

६० किलो वजन गट :-

— प्रथम बक्षीस – ३००१/-

   संजय मोहिते,नागपूर..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

    दुर्गेश ओमकार,नागपूर..

— तृतीय बक्षीस – १००१/

     निखिल लक्षणे,चंद्रपूर..

**

६५ किलो वजन गट :-

— प्रथम बक्षीस – ३००१/-

    महेश काळे,नागपूर..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

     निदुन ब्रोंद्रे,भंडारा..

— तृतीय बक्षीस – १००१/-

    यशपाल शर्मा,चंद्रपूर..

**

७५ किलो वजन गट :-

— प्रथम बक्षीस – ५००१/-

    शुभम मंडल,ब्रम्हपुरी..

— द्वितीय बक्षीस – ३००१/-

    आकाश चौधरी,चंद्रपूर..

— तृतीय बक्षीस – २००१/-

    सुजीत चिलबुले,ब्रम्हपुरी..

**

महिला गट :-

५० किलो वजन गट

— प्रथम बक्षीस – ३००१/-

   ममता ढेंगे,भंडारा

— द्वितीय बक्षीस – २००१/-

   अंशिता मनोहर,नागपूर..

— तृतीय बक्षीस – १००१/-

प्रणाली मुन,चंद्रपूर..

**

५५ किलो वजन गट :-

प्रथम बक्षीस – ३००१/-

अंतरा चौधरी,चंद्रपूर..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

कशिश शेतमाळे,ब्रम्हपुरी..

— तृतीय बक्षीस – १००१/-

प्रणाली जंजाळ,भंडारा..

**

६० किलो वजन गट :

— प्रथम बक्षीस – ३००१/-

   कल्याणी मोहारे,नागपूर..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

     स्नेहा मेश्राम,चंद्रपूर..

— तृतीय बक्षीस – १००१/-

    श्रितीजा कामडे,मुल..

**

६५ किलो वजन गट :

— प्रथम बक्षीस – ३००१/-

     तन्नु जाधव,ब्रम्हपुरी..

— द्वितीय बक्षीस – २००१/-

    प्रियंका भोयर,चंद्रपूर..

— तृतीय बक्षीस – १००१/-

    सुचिता ढेंगरी,ब्रम्हपुरी..

***

७५ किलो वजन गट :-

— प्रथम बक्षीस – ५००१/-

शितल सव्वालाखे,नागपूर..

— द्वितीय बक्षीस – ३००१/-

   नंदीनी थापा,ब्रम्हपुरी..

— तृतीय बक्षीस – २००१/-

   निकीता लांजेवार,नागपूर..

         याप्रसंगी कुस्ती सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा हनुमान व्यायाम मंडळ भिसी व डॉ.सतीश वारजूकर मित्र परिवाराच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

        याशिवाय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद पुणे,चंद्रपूरच्या ज्येष्ठ पदाधिकारी तथा कुस्ती सामन्यामध्ये पंच म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या मुकेश पांडे,उमेश बडवाईक,राज्यस्तरीय पंच केशव डंभारे,अशोक बन्सोड,कविता घोरमोडे,यांचाही सत्कार करण्यात आला.

        कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यासाठी व दंगल सामने यशस्वी करण्यासाठी जोड मारोती देवस्थान कमेटी भिसी, धाबाडा मारोती देवस्थान कमेटी भिसी,श्री.छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय मंडळ भिसी,टायगर ग्रुप भिसी,वाल्मिक क्रीडा मंडळ भिसी,प्लेयर्स क्रिकेट क्लब भिसी,खातीपुरा हनुमान व्यायाम मंडळ भिसी या संस्थांनी,सहकारी सदस्य,पत्रकार,भिसीवासीय नागरिक,पोलीस प्रशासन,श्री विठ्ठल – रुखमाई देवस्थान कमेटी भिसी यांनी मोलाचे सहकार्य केले.

          दंगलीचा कार्यक्रम बघण्यासाठी भिसी व परिसरातील हजारो नागरिकांनी मैदानात गर्दी केली होती.