मुंबईच्या चैत्यभूमी सह जगातील नागरिकांनी केले,युगपुरुष-युगपर्वतक-बोधिसत्व,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनंम्रपणे अभिवादन..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

              भारत देशातील तमाम नागरिकांना मुलभूत व बाह्य मुलभूत अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल करणारे तथा जगातील पिडित-शोषीत-अत्याचारग्रस्त, अधिकारविहिन मानसाला मानुस म्हणून जगण्यासाठी मानविय चेतना निर्माण करणारे जगविख्यात थोर समाजसुधारक,युगप्रवर्तक,युगपुरुष-महामानव,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगातील करोडो नागरिकांनी आज विनंम्रपणे अभिवादन केले.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील विश्व विख्यात प्रकांड पंडित आहेत.याच बरोबर थोर समाजसुधारक म्हणून त्यांची जगात ख्याती आहे.

            भारत देशातील जहाल असा अन्यायकारक व अत्याचार कारक मनूचा वर्णव्यवस्था कायदा उलथून टाकीत भारतीय संविधान निर्माण केले.तद्वतच गुलाम व लाचार मानसिकतेतून या देशातील तमाम बहुजन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र संघर्षान्वये कष्ट उपसले. 

            या देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,अधिकारविहिन समाजासाठी कायदेशीर शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे व याच समाज घटकातील सर्व नागरिकांना व इतर सर्व समाज घटकातील नागरिकांना सर्व प्रकारचे अधिकार बहाल करणारा महा-युगपुरुष म्हणजे भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत.

      शोषीत,पिडीत,अत्याचारग्रस्त समाजातील नागरिकांसह भारत देशातील तमाम समाज घटकातील नागरिकांनी खूप शिक्षण घ्यावे,समजदार व अनुभवी बनावे,या देशातील सर्व प्रकारच्या सत्तेचे व सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयाचे,खाजगी संस्थानांचे प्रतिनिधीत्व करावे आणि आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करावे, या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात हक्क अंतर्भूत करुन ठेवली आहेत.

           भारत देशातील तमाम नागरिकांना मानुस बनविणारा संघर्ष केला व संघार्षातंर्गत यशस्वी क्रांती घडवून आणली‌.म्हणूनच बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वोच्च अशा समाज सुधारणेकडे जग प्रेरणादायी दूरदृष्टीने बघतो आहे.

          तद्वतच युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून चारित्र्यसंपन्न समाज घडविण्याचा मार्ग मोकळा केला.

             बौद्ध धर्माचा स्वीकार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला परत्वे जगात मानसन्मान मिळवून दिला.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक कार्ये व कर्तव्ये हे प्रेरणादायी असल्यामुळे भारत देशातील करोडो नागरिकांसह जगातील नागरिक आज विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनंम्रपणे अभिवादन करतो आहे.