शौर्य जागरण यात्रेचे अलंकापुरी नगरीत जोरदार स्वागत…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

       आळंदी : विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे शनिवारपासून (ता. ३०) शनिवारपर्यंत (ता. १४ ऑक्टोबर) श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष अशा दोन घटनांचे औचित्य साधून संपूर्ण भारतात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आयोजित केलेल्या शौर्य जागरण यात्रेचे महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र आळंदी या संतभुमीत जोरदार स्वागत करण्यात आले.

         गुरुवारी (ता. ५) सकाळी नऊ वाजता पिंपरी – कासारवाडी – भोसरी – दिघी – आळंदी येथे पोहोचली. ढोल ताशा पथक, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण तसेच जय भवानी जय शिवाजीचा जयघोषात संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रांतमंत्री प्रा.संजय मुदराळे, सहमंत्री ॲड.सतिश गोरडे, संयोजक लहूकुमार धोत्रे, सहसंयोजक नितीन महाजन, विभाग संयोजक नाना सावंत तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक पांडुरंग वहीले, दिनेश घुले, माजी उपसरपंच किरण मुंगसे, मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, आशिष गोगावले, गणेश गरूड, मंगेश काळे, आप्पा पगडे, पद्माकर तापकीर, शशी राजे जाधव, सागर वहीले, किरण काळे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी बहूसंख्येने उपस्थित होते.