इंजि.नामदेव राशिनकर व डॉ.माया चरडे यांना भारत सरकारच्या वतीने पेटंट बहाल…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

      आळंदी : माईर्स एम.आय.टी. पुणे संचलित एम.आय.टी.अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, आळंदी येथे कार्यरत असणारे इंजि.नामदेव शंकरराव राशिनकर (रा.चांदा,ता.नेवासा) आणि प्रा.डॉ.माया मधुकर चरडे (रा.देहुरोड पुणे) यांना भारत सरकारने यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण पेटंट बहाल केले आहे.

         “टेम्परेचर मेझरमेंट टेक्निक फॉर कंबाइन्ड फेस ॲन्ड शोल्डर ग्राईंडीग ऑपरेशन” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सदर शोधकार्यासाठी सायन्स ॲन्ड इंजिनिअरींग रिसर्च बोर्ड, भारत सरकार तर्फे अकरा लाख रुपये अर्थसहाय्य मिळाले आहे. या आधीही त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात काही निवडक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ब्रिटन येथील ईस्ट अंजिलिया विद्यापीठातील डॉ.योगेश भालेराव हे त्यांचे मार्गदर्शक होत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड सर यांच्या हस्ते त्यांचा एक्कावन्न हजार रूपये, शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. संचालक डॉ‌महेश गौडर, उपसंचालक डॉ.सुनिता बर्वे, डॉ.शितल जैन, अधिष्ठाता डॉ.अभिजीत माळगे व शिक्षक वृंद आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.