न्यूज वेबपोर्टल,” मजबूत बातमीपत्र म्हणून,रुजू लागले आहेत जनमानसात… — एक मोठी क्रांती!… — भारतातील न्यूजक्लिक वेबपोर्टलचेच जगप्रसिद्ध उदाहरण घेवूया…

 

प्रदीप रामटेके 

   मुख्य संपादक

            बऱ्याच न्यूज वेबपोर्टलचे मुख्य संपादक,संपादक व इतर बातमी संकलनकर्ता आणि प्रतिनिधी हे बेधडक,सत्य घडमोडींवर व घटनांवर आधारित वृत्त संकलन करुन त्या वृत्ताद्वारे निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करण्याचे काम करीत असल्याने,”न्यूज वेबपोर्टल हे सोशल मीडियाच्या माध्यमातून, जगातील जनमानसात रुजू लागले असल्याचे वास्तव्य पुढे आले आहे आणि न्यूज वेबपोर्टलच्या बातम्यांना जनमानस अत्यंत महत्व देत असल्याचे सत्य सुध्दा उघड झाले आहे.

            सुरुवातीला न्यूज वेबपोर्टला प्रकाशित होणाऱ्या बातम्यांना कमी लेखने,वेबपोर्टलच्या संपादक व प्रतिनिधींकडे हिन दृष्टीने बघने,त्यांना हिणवने,हा प्रकार बऱ्याच अंशी घडला.

          पण,जगापाठोपाठ,”भारत सरकारनेही,अधिनियम संस्था अंतर्गत न्यूज वेबपोर्टला शासकीय व प्रशासकीय मान्यता देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील बातम्या तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्याची मोठी क्रांती केली.

          आजच्या घडीला न्यूज वेबपोर्टल हे भारत देशातील जनतेचे तारणहार ठरु लागली आहेत,हिच तर न्यूज वेबपोर्टलची यशस्वी गाथा आहे व इतिहासिक क्रांती अंतर्गत जनशक्ती ठरली आहे.

***

“न्यूजक्लिक” वेबपोर्टल…

            न्यूज वेबपोर्टला(सोशल मिडिया बातमी पत्र) भारत देशासह जगात महत्व आहे हे सध्याच्या “न्यूजक्लिक” चौकशी अंतर्गत अटक प्रकरणावरुन लक्षात घेतले पाहिजे.

         “न्यूजक्लिक” वेबपोर्टल बेधडक वृत्त संकलनाच्या माध्यमातून जगात प्रशिध्द झाले असल्याने जगातील लोकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्यात असे दिसून येते आहे.

         गार्डियन ने लिहिले आहे कि,”न्यूजक्लिक” भारतात काही वाचलेल्या स्वतंत्र बातम्या संघटन पैकी एक आहे.त्यांच्या बाबत २०२१ पासून प्रवर्तन निदेशालयाच्या माध्यमातून चौकशी सुरु होती आणि चिन देशा कडून भारता विरुद्ध प्रचार करण्यासाठी करोडो रूपयांचा आर्थिक व्यवहार केला म्हणून ३ आक्टोंबरला मुख्य संपादक पुरकायस्थ यांना त्यांच्या एका कर्मचाऱ्यासह मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यातंर्गत अटक केली.

           पुढे “न्यूजक्लिक” मनी लॉन्ड्रींग प्रकरणाचे काय होणार हे न्यायालयाच्या निकालानंतर कळेलच.‌..

****

महत्वाचे…

        आजच्या घडीला न्यूज वेबपोर्टलचे मुख्य संपादक,संपादक,कार्यकारी संपादक,उपसंपादक,वृत्त संकलनकर्ता प्रतिनिधी विविध विषयांवर व विविध घडामोडींवर बारीक नजर ठेऊन असतात व शहरासह तळागाळातील नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतात,नव्हे तर प्रयत्नांती पराकाष्ठा करतात.

             आणि समाजिक समतोलपणा कायम ठेवण्यासाठी विविध कर्तव्यातंर्गत धडपडता.समाजिक समतोलपणासाठी कर्तव्य पार पाडणे हेच त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे,हे नाकारुन चालणार नाही.