आमची सदसदविवेक बुद्धी मनुवाद्यांनी कायमची मारून टाकली का?
“आमचा बुद्धीजीवी वर्ग तर कायमचा मेलेलाच आहे. त्या बिचाऱ्याला दोष न देता त्याला त्याच्या मानसिकतेवर सोडून देऊन आपण त्याची भूमिका पार पाडण्याची प्रतिज्ञा केलीच आहे. मागील अनेक भागाच्या पोस्ट मधून.
लोकशाहीतील निरागस रांगते बाळ अर्थात सर्वसामान्य जनता हिलाच सर्वस्वी करण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे. तिलाच समर्थपणे पेलावेच लागणार आहे.
त्यासाठी तत्ववेत्ते आणि महापुरुष यांच्यात आणि आपल्यात,(सर्वसामान्य जनतेत),या नकली बुद्धीजीवी वर्गाने खोट्या विद्वत्तेचा भुरळ घालणारा जो पडदा निर्माण केला तो फाडून थेट महापुरुष आणि तत्ववेत्त्यांची वैचारिक क्रांती आपल्यापर्यंत आपणच आणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आपण प्रतिज्ञा केलेली आहे.
“प्रथम आत्मपरीक्षण करा, नंतर समाजपरीक्षण करा.:- सॉक्रेटीस…
( जागतिक तत्वज्ञ,लोकशाही मूल्यांच्या अविष्कारितेसाठी ग्रीक मनुवादी व्यवस्थेने त्याला देहदंडाची शिक्षा केली आनंदाने ती त्याने विष प्राशन करून स्वीकारली,)
सुमारे 2400 वर्षांपूर्वी या तत्ववेत्त्याने जगात मानवी कल्याणासाठी तसेच लोकशाही मूल्यांच्या अविष्कारितेसाठी का आत्महत्या करून देहादंडाची शिक्षा स्वीकारली?
या प्रश्नाचे सविस्तर उत्तर केवळ आणि केवळ याच निरागस बाळाला उभे राहून शक्ती येण्यासाठी उद्याच्या याच भाग एक मधील (क ) मध्ये….


