चिरफाड
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र सरकार,गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मिलींद म्हैसकर यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ ला,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,महसूल मंत्री सचिवालय मुंबई,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका,चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर ठाणेदार,भिसी ठाणेदार,यांना गृह मंत्रालय सचिवालयाच्या ई-मेल द्वारे संदेश पाठविला व चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधाने कारवाई करावी असे सुचित केले.
परंतु महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या अतिरिक्त अप्पर मुख्य सचिव मनीषा मिलींद म्हैसकर यांनी,”चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे या अनुषंगाने ई-मेल द्वारा पाठवलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन,चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,चिमूर उपविभागीय अधिकारी,चिमूर तहसीलदार,चिमूर एसडिपीओ,चिमूर ठाणेदार,भिसी ठाणेदार यांनी,त्यांचा एकप्रकारे अनादर केला असल्याचे दिसून आले.
याचबरोबर चिमूर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरु ठेवू,पण गृह मंत्रालयातील अतिरिक्त अप्पर मुख्य सचिवांच्या सुचनांचे पालन करणार नाही.म्हणजे गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसल्याचा चंद्रपूर जिल्हातंर्गत व चंद्रपूर येथील संबंधित अधिकाऱ्यांनी हेकेखोर वृत्ती अंतर्गत आगळावेगळा अनुचित संदेश दिला.
माफीयांचा सरगमा कोण?..…
चिमूर तालुक्यातील वेश्याव्यवसायासह अवैध धंदे बंद करु न देणारा माफीयांचा तो सरगमा कोण? हा प्रश्न अवैध धंद्यातंर्गत,”भयानकतेच्या थराराचे दर्शन करतो आहे.
मात्र,चिमूर तालुक्यात अवैध व्यवसाय सुरु ठेवणारा माफीयांचा सरगमा हा मोठा डाकू व गूंडा असून तो चंद्रपूर जिल्हातंर्गत संबंधित अधिकाऱ्यांना,”राजकीय संरक्षण देतो आहे,..
यामुळे हा सरगमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,यांनांही नोटांच्या बंडलाप्रमाणे खिशात गुंडाळून ठेवत आहे काय? हा मुद्दा अधिकच गंभीर!
महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालकांच्या एसपी चंद्रपूर यांना सुचना…..
महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना दिनांक ४ एप्रिल २०२६ ला ई-मेल पाठवून स्पष्ट केले की,चिमूर तालुक्यातील वेश्याव्यवसायासह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे व केलेल्या कारवाई बाबत तक्रारदारास कळवावे.
मात्र आजचा तिसरा दिवस सुरु असताना चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हे चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधाने संवेदनशील,कर्तव्यतत्पर झाले नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिस अधीक्षक चंद्रपूर…..
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांची इत्यंभूत माहिती आहे.एवढेच काय तर ७० टक्के माफीयांची माहिती त्यांना आहे.
असे असताना चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ते सुद्धा पुढे धजावत नाही,या त्यांच्या चुप बसण्याला काय म्हणावे?
ते एक उत्तम कर्तव्याचे,योग्य सचोटी अधिकारी आहेत की,कर्तव्याला बाजूला सारून शांत बसणारे आणि चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आहेत.
उपविभागीय अधिकारी चिमूर व तहसिलदार चिमूर हे कर्तव्यहिन अधिकारी?…..
चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे व चिमूर तहसिलदार श्रिधर राजमाने चिमूर यांना सुध्दा चिमूर तालुक्यातील वाळूचे व मुरुमांचे अवैध उत्खनन बंद करण्यासाठी,दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ ला ई-मेल गृहमंत्री सचिवालयातून आलेला आहे.
परंतु या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याकडे पाठ फिरवली असून,”वाळू व मुरुम माफीयांना,खनीज संपंतीची चोरी करण्याचे मार्ग मोठ्या प्रमाणात खुले करुन ठेवले आहेत.
यामुळे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे व चिमूर तहसिलदार श्रिधर राजमाने यांनी,सदर “ई-मेल कडे दुर्लक्ष करुन अतिरिक्त अप्पर मुख्य सचिव गृह मंत्रालय मनीषा मिलींद म्हैसकर IAS, यांना एकप्रकारे ठेंगा दाखवला आहे.
ठाणेदार चिमूर,ठाणेदार भिसी हे सुद्धा कर्तव्य चुकार?…..
ठाणेदार दिनेश लबडे हे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या पसंतीचे खासमखास पोलिस अधिकारी असल्याने,ठाणेदार दिनेश लबडे यांच्या कर्तव्यातंर्गत संवेदनशीलतेचा,सचोटीचा योग्य व उत्तम कार्यभाग मानसिक गुलाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
भिसी पोलिस ठाणेदार मंगेश भोंगाडे हे मनाचे राजे असल्याने सध्यातरी त्यांचे कर्तव्य व कर्तृत्व पोलिस स्टेशन इमारतीतच घुमत आहे.
या दोन्ही जबाबदार ठाणेदारांना गृह मंत्रालयातील अतिरिक्त अप्पर मुख्य सचिवांचा ई-मेल दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ ला प्राप्त असून यांनी सुध्दा मंत्रालयातील ई-मेल ला,”बासनात गुंडाळून ठेवले आहे.
चिमूरातील वेश्याव्यवसाय…..
मानीक नगर चिमूर येथील नागरिकांच्या माहिती वरुन ठाणेदार दिनेश लबडे व त्यांच्या चमूंनी दिनांक ०१ एप्रिल २०२६ ला सायंकाळी ९ ते साडेनऊ च्या दरम्यान,चिमूर येथील मानीक नगर मधून वेश्याव्यवसाय करणा-या ३ तरुणींना तब्यात घेतले व पोलीस स्टेशन चिमूर येथे नेले.
पोलिस स्टेशन चिमूर येथे ३ तरुणींना नेल्यानंतर त्या तरुणींचे काय झाले?,त्यांना सोडले की कुठे नेवून ठेवले?,त्या ३ तुरुणींना सोडण्यामागचे नेमके कारण काय?,उद्देश काय?,कुणाला वाचविण्यासाठी त्या ३ तरुणींचा कसून तपास करण्यात आला नाही?,असे अनेक प्रश्न निर्माण होताहेत.
याचबरोबर चिमूर शहरात अनेक स्थळी वेश्याव्यवसाय सुरु असल्याच्या स्थिनीक नागरिकांत खमंग चर्चा आहेत.
एक वर्षापूर्वी चिमूरातील एका हाॅटेलवर वेश्याव्यवसाय संबंधाने धाड टाकण्यात आली होती.त्या हाॅटेल मधून ३५ ते ३८ विद्यार्थ्यींनींना ताब्यात घेतले होते.पण,या धाडीत विद्यार्थींनी झापडल्याने ते प्रकरण शांत झाले व तिथल्यातिथेच सदर प्रकरण थांबविण्यात आले होते अशीही लोकचर्चा आहे.
पण यासंबंधाने आता १ एप्रिल २०२६ च्या प्रकरणाने,जुन्या प्रकरणाला लोक चर्चेतून जोर धरला असल्याचे दिसून येत आहे.
चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे…..
वाळू व मूरुमांचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात धंदे सुरु असताना चिमूर येथील महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी झोपा काढत आहेत.
तद्वतच चिमूर तालुकातंर्गत पोलिसांच्या कर्तव्यावर टिचून,”देशी दारूचा खेड्यापाड्यात होणारा बिनधास्त पुरवठा व देशी दारुच्या पुरवठ्याद्वारे मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यात होत असलेली देशी दारुची खुल्लंमखुला विक्री अचंबित करणारी आहे.
याचबरोबर चिमूर,शंकरपूर,भिसी,नेरी,जांभुळघाट,मोटेगाव आणि खेड्यापाड्यात सट्टा व्यवसाय जोमात सुरु आहे.
माफीयांचा सरगमा कोण?….
चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु ठेवणारा व ठेवू इच्छिणारा अवैध धंदे माफीयांचा तो सरगमा कोण आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.
कारण या माफीयांच्या सरगमाला चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,चिमूर उपविभागीय अधिकारी,चिमूर एसडिपीओ,चिमूर ठाणेदार,भिसी ठाणेदार घाबरत असल्याचे,”त्यांच्या कर्तव्यहिन कृती वरुन दिसून येत आहे.
याचबरोबर या माफीयाच्या सरगमाला स्थानिक चंद्रपूर अधिकाऱ्यांसह,चिमूर तालुक्यातील अधिकारी घाबरून अवैध धंदे सुरु ठेवीत असल्याने अधिकाऱ्यांवर वचक ठेवणारा माफीयांचा तो सरगमा कोण?.याचा शोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे व त्याला अटक केली पाहिजे असेच गंभीर प्रकरण आहे.
चिमूर तालुक्यातील वाळू व मुरुम अवैध धंद्यांचे प्रकरण लहान नसून खरबो रुपयांचा महसूल बुडविणारे आहे.तद्वतच तालुक्यात दररोज चालणारा सट्टा व्यवसाय,खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात देशी दारुची होणारी विक्री बघता,या अवैध धंद्यातंर्गत दररोज लाखो-करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले पाहिजे काय?…..
चिमूर तालुक्यातील अवैध वेश्याव्यवसायाकडे,अवैध सट्टा व देशी दारू विक्रीकडे,अवैध वाळू व मूरुम उत्खननाकडे दुर्लक्ष करणारे,स्थानिक अधिकारीच असल्याने त्यांना अधिक चौकशीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले पाहिजे या मताची जनता आहे.
याचबरोबर चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याशिवाय माफीयांचा तो सरगमा कोण आहे,हे जनतेसमोर येणार नाही.
आदेश न माणणाऱ्या अधिकाऱ्याचे काय करणार?….
गृह मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव मनीषा मिलींद म्हैसकर यांच्या सुचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र सरकार काय करणार?
याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी,चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधाने पाठवलेल्या सुचनांचे ते पालन करणार काय? या प्रश्नाचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल.
अधिकाऱ्यांचे संबंध?….
चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,चिमूर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार चिमूर,एसडिपिओ चिमूर,ठाणेदार चिमूर,ठाणेदार भिसी हे चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने,त्यांचे संबंध माफीयांसी व माफीयांच्या सरगमासी आहेत काय?
जर त्यांचे संबंध माफीयांसी व माफीयांच्या सरगमासी असतील तर,”योग्य प्रशासकीय सेवा कार्यासाठी धोकादायकच आणि धक्कादायकच!..



