साखरी येथे जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती रॅली…

युवराज डोंगरे खल्लार

         उपसंपादक

           खल्लार नजिकच्या साखरी येथिल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पिंक फोर्स उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यावी या अनुषंगाने गावातून रॅली व प्रभात फेरी काढण्यात आली.

            तसेच वृद्ध व दिव्यांग व्यक्तींच्या घरी भेटी देऊन त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आले. मतदान करण्यासंबंधीचे पोस्टर हाती घेऊन विद्यार्थ्यांनी मतदान करण्याविषयी मतदारांना मोलाचा संदेश दिला याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस तसेच विद्यार्थी आणि गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती.