लुमेवाडी येथील निरा नदीपात्रात वाळू मिश्रित मुरूमाचे उत्खनन.. — 2 चैन कोकलेट व अनेक टिप्परच्या साह्याने बेसुमार उपसा चालू आहे. — महसुल प्रशासनाकडे उत्खननाची चौकशी करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी… 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

     लुमेवाडी तालुका इंदापूर येथील निरानदी पात्रात वाळू मिश्रित मुरूमाचे जोमात उत्खनन सुरू असल्याचे गंभीर प्रकरण पुढे आले आहे.

         या उत्खननातंर्गत 2 चैन कोकलेट व अनेक टिपरचा दैनंदिन उपयोग होतो आहे.

          इंदापूर तहसील विभागाकडून उत्खननाची रॉयल्टी काढली आहे का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.तसेच दररोज किती ब्रास माल उचलला जातो.हा वाळू मिश्रित मुरूम कोणत्या दिशेने चालू आहे.

         एकीकडे पालखी मार्गाचे काम चालू आहे.त्या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी वापर होतो का? अगर इतर कोणत्या ठिकाणी वाळू मिश्रित मुरूम टाकलेला आहे.त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.

      खाजगी शेतकऱ्याला वाळू मिश्रित मुरूम लागत असेल तर त्याची त्याला रायलटी भरावी लागते.तर हा नीरा नदी पात्रातला वाळू मिश्रित उपसा करण्यासाठी परवानगी मिळाली आहे का?

       वाळूचा उपसा केल्यास नदीपात्रात पाणी टिकून राहणार नाही, अन्य प्राणी,पशुपक्षी,मुके जनावरे यांना पिण्यासाठी दररोज पाण्याची गरज असते.वाळूचे उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी साठवून न राहण्यामुळे वन्यप्राणी व मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याविना भटकंती होणार आहे.

        वाळू मिश्रित मुरमाचे चालू असलेले उत्खनन थांबवण्यात यावे अशी लुमेवाडी येथील ग्रामस्थांची मागणी.महसूल विभागाने तातडीने चौकशी करून वाळू मिश्रित मुरूमाचा उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी जनमानसांची आहे.