जंगलातील वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले, रहदारीस अडथळा… — दुचाकी स्वार थोडक्यात बचावला…

धानोरा /भाविक करमनकर 

      मुरूम गाव येथून सात किलोमीटर अंतरावर मुरूमगाव-मालेवाडा मार्गावर फुलकोडो नजदीक च्या वळणावर जंगलात लागलेल्या वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले त्यामुळे चार चाकी वाहना च्या रहदारी ला अडथळा निर्माण झाला आहे.

 फुलकोडो च्या जंगल परिसरात काल रात्रीपासून लागलेल्या वनव्यामुळे पेटत असलेले झाड अचानक आज दुपारी12 च्या दरम्यान रस्त्यावर पडले, त्यामुळे चार चाकी वाहनांना रहदारीस अडथळा निर्माण झाला असून त्यांना आपले वाहन उलट जयसिंगटोला ते येरकड मार्गे मुरूमगाव असे मार्ग क्रमन करावे लागत आहे. दुचाकी स्वाराना आपले वाहन जंगलातून काढताना बरीच दमछाक होत आहे. आज सकाळी आठ वाजे दरम्यान या परिसरात अवकाळी पाऊस आला,त्यामुळे जंगलातील पेट घेतलेले झाड अचानक पडले, त्याच वेळेस रहदारी करणारा दुचाकी स्वार थोडक्यात बचावला.जंगलातील वनव्या मुळे परिसरातील वृक्ष संपदाचे मोठ्या प्रमाणात नुकसाना सह रहदारीस अडथळा निर्माण होतो याकडे वन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.