वैराग्यमुर्ती वै.जयराम बाबा भोसले यांच्या १५व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन.

दिनेश कुऱ्हाडे

 प्रतिनिधी

आळंदी : सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैराग्यमुर्ती वै.जयराम बाबा भोसले यांच्या १५व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ७ एप्रिल ते १४ एप्रिल रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात करण्यात आले आहे,यात सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे नित्यपाठ,भजन, हरिपाठ आणि कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे असे वै.जयराम बाबा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने मृदुंगरत्न पुरस्कार हभप हरिविजय महाराज क्षीरसागर यांना वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर आणि माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

         यावेळी शंकर महाराज मराठे,सागर महाराज बोराटे,रविदास महाराज शिरसाट,रविंद्र महाराज गाडेकर,अमृताश्रम स्वामी,केशव महाराज नामदास,भागवत महाराज शिरवळकर, जयवंत महाराज बोधले, शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून किर्तन सेवा संपन्न होणार आहे असे बाळासाहेब महाराज शेवाळे आणि विश्वंभर महाराज शेवाळे यांनी सांगितले आहे.