विद्यार्थ्यांना घरी सोडायला आली माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी.

नीरा नरसिंहपुर दिनांक:6

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

 लासूर्णे तालुका इंदापूर येथील श्री. निलकंटेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी थेट तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे स्वतः गाडीत बसून आले. आमदार दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देत होते. यावेळी लासूर्णे येथे काही विद्यार्थी थांबलेले दिसले. यावर त्वरित गाडी थांबवत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांना कुठे जायचे आहे याची चौकशी केली व विद्यार्थ्यांना घेऊन गाडी थेट अंथुर्णे गावामध्ये पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी आनंदमन सुखावणारा असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यानी सांगितले.