वांगेपल्ली ग्रा.प.सदस्य राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला राम राम करून आविस तथा अजयभाऊ मित्र परीवारामध्ये जाहीर प्रवेश… — माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार..!!

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

          आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अजयभाऊ मित्र परीवार चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करण्यात आले आहे.ग्रामपंचायत कार्यालय वांगेपल्ली चे सदस्य निलेश शंकर आलाम यांनी काही कारणांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवार मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केले आहेत.माजी जि.प.अध्यक्ष यांच्या अहेरी येथील कार्यालयात सदर पक्षा प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.सदर प्रवेश केलेल्या पदाधिकारी यांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले..!!

       या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य अजयभाऊ नैताम,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली (गेरा),प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,संतोष येरमे सदस्य,कल्पना ताई सदस्य,महेश नैताम,अशोक येलमुले माजी उपसरपंच किस्तापूर,शैलेश आलाम,हनमतू आत्राम,दलसू आत्राम उपसरपंच मेडपल्ली,विजय आत्राम,राजू दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव,चंद्रांजी रामटेके,मनोज तलांडे,वसंत पिपरे,नागेश तोर्रेम, गुलाब सोयाम,हनमांतू आत्राम,विनोद दुनालवार, आनंदराव आतकूलवार,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार आरेदा आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.