सौ.रुक्मिणी घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त गुरुवर्य कानोबा महाराज देहुकर, पंढरपूर यांची कीर्तन सेवा सांगण्यात आली.

 

नीरा नरसिंहपूर दिनांक: 6

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

 गणेशवाडी तालुका इंदापूर येथे सौ. रुक्मिणी मारुतीभाऊ घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कीर्तन सेवा करण्यात आली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य कानोबा महाराज देहुकर पंढरपूर यांची या निमित्त कीर्तन सेवा झाली. 200 हून अधिक टाळकरी भजनी मंडळ व हजारोच्या संख्येने भाविक भक्त या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त उपस्थित होते. प्रगतशील बागायतदार व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ घोगरे व भारत घोगरे यांच्या आई तर बावडा/गणेशवाडी ग्रामपंचायत सदस्य मयूर घोगरे यांच्या आजी होत्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुरुवर्य कानोबा महाराज देहुकर पंढरपुर,, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे,, संचालक उदयसिंह पाटील, भारत जगदाळे, महेश जगदाळे, मनोज जगदाळे, बावडा सरपंच किरणकाका पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,, व्हाईट चेअरमन व सर्व संचालक मंडळ,तशेच गणेशवाडी, बावडा अकलूज, गारअकोले, नरसिंहपूर, सराटी, पिंपरी बुद्रुक,ओझरे, गिरवी, गोंदी, टणु , संगम, शेवरे, तांबवे, लवंग, महाळुंग, आशा आनेक ठिकाणाहून वारकरी व भाविक उपस्थित होते. टाळकरी विणेकरी मृदंग वादक, आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ आजी मजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.