तालुक्यातील करंभाड येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाची शानदार सांगता… — मैदानी खेळात पं. स.सावनेर तर सांस्कृतिक कार्यक्रमात पं.स.कुही सांघिक विजेतेपदाचे मानकरी…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

        पारशिवनी ::-शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर द्वारा पंचायत समिती पारशिवनी मधील सेक्रेड स्कूल करंभाड येथे आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप व बक्षीस वितरण जिल्हा परिषद नागपूरच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, करंभाड जिल्हा परिषद चे सदस या सौ अर्चना दीपकराव भोयर, पारशिवनी सभापती मंगला उमराव निंबोने, हिंगणा सभापती सुषमा कावळे, पारशिवनी उपसभापती करुणा भोवते, पंचायत समिती सदस्य संदीप भलावी, नरेश मेश्राम, अनुसया सोनवाने, राजेंद्र उईके, सुनील बोदाडे, माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर झाडे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रपाल गोरले, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पारशिवनी गट विकास अधिकारी सुभाष जाधव, सावनेर गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

           या क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळातील सांघिक विजेतेपद पंचायत समिती सावनेर आणि उपविजेतेपद पंचायत समिती उमरेड यांनी प्राप्त केले.तर सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेतेपद पंचायत समिती कुही आणि उपविजेतेपद पंचायत समिती काटोल यांनी प्राप्त केले. मैदानी खेळातील आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  

          तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचे नेतृत्वात उपशिक्षणाधिकारी विजय कोकोडे, निखिल भुयार, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर झोडे, रमेश हरडे यांनी केले. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंचायत समिती पारशिवनी येथील केंद्रप्रमुख, क्रीडा स्पर्धेच्या समिती मधील सर्व शिक्षक आणि पारशिवनी, रामटेक, सावनेर येथील पंच म्हणून कार्य करणारे क्रीडा शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतलेत.

          बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी, सूत्रसंचालन शिक्षक खुशाल कापसे, कीर्ती सहारे आणि तिलक भुते यांनी तर आभारप्रदर्शन पारशिवनीचे गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांनी केले.

स्पर्धेतील गटनिहाय विजेते

कनिष्ठ गट

कबड्डी मुले:- प्रथम माळेगांव शाळा (सावनेर), द्वितीय पालासावळी शाळा (पारशिवनी), 

कबड्डी मुली:- प्रथम कोच्छी शाळा (सावनेर), द्वितीय झिल्पा शाळा (काटोल),

 खो – खो मुले :- प्रथम मुसेवाडी शाळा (रामटेक), द्वितीय पेठ मुक्तापूर शाळा (नरखेड),

 खो – खो मुली :- प्रथम चिकना शाळा (कुही), द्वितीय चिरव्हा शाळा (मौदा),

 लंगडी :- प्रथम आलेसुर शाळा (भिवापूर), द्वितीय शेडेश्वर शाळा (उमरेड)

वरिष्ठ गट

कबड्डी मुले :- प्रथम विरसी शाळा (मौदा), द्वितीय वाघोडा माईन शाळा (सावनेर),

 कबड्डी मुली :- प्रथम खैरीबुटी शाळा (उमरेड), आजनी शाळा (रामटेक), खो – खो मुले:- प्रथम रुयाड शाळा (कुही), द्वितीय सावरा शाळा (रामटेक), 

खो – खो मुली :- प्रथम पेठमुक्तापूर शाळा (नरखेड),

 लंगडी :- प्रथम रूयाड शाळा (कुही), द्वितीय बोरडा शाळा (रामटेक), 

रिले रेस मुले:- प्रथम मांगरूळ शाळा (नागपूर ग्रामीण), द्वितीय महालगाव शाळा (भिवापूर), 

रिले रेस मुली :- प्रथम पुसागोंदी शाळा (काटोल), द्वितीय विरसी शाळा (मौदा)

वैयक्तिक खेळ 

१००मीटर दौड मुले प्रथम हिमांशू वाघाडे (उमरेड), द्वितीय आदिल फुकट (कामठी), 

१०० मीटर दौड मुली प्रथम जान्हवी वैद्य (कुही), द्वितीय शिवानी कोवाचे (रामटेक), 

२०० मीटर दौड मुले प्रथम आयुष गुप्ता (सावनेर), द्वितीय शिवम धुर्वे (उमरेड), २०० मीटर दौड मुली प्रथम अंशू कुंभरे (सावनेर), द्वितीय खुशी पवार (काटोल),

 लांब उडी मुले प्रथम आयुष गुप्ता (सावनेर), द्वितीय शिवम धुर्वे (उमरेड), लांब उडी मुली प्रथम दिव्यानी नेवारे (उमरेड), द्वितीय अनु पायरे (भिवापूर),

 उंच उडी मुले प्रथम समीर राऊत (नागपूर ग्रामीण), द्वितीय आयुष गुप्ता (सावनेर), 

उंच उडी मुली प्रथम खुशी पवार (काटोल), द्वितीय वैष्णवी मरस्कोल्हे (पारशिवनी), 

बुद्धिबळ प्रथम सार्थक गोर (नरखेड), द्वितीय रुद्रव काथोटे (काटोल), कुस्ती २४ किलो प्रथम अथर्व बावनकुळे (पारशिवनी), द्वितीय अनिकेत फुलझेले (रामटेक), 

कुस्ती २८ किलो प्रथम धर्मराज बागडे (कामठी), द्वितीय आदर्श उईके (रामटेक), 

कुस्ती ३० किलो प्रथम साहिल लांडगे (मौदा), द्वितीय साहिल नेहारे (नरखेड), 

कुस्ती ३२ किलो प्रथम नैतिक मोरे (नरखेड), द्वितीय दिनवेश चव्हाण (काटोल)

सांस्कृतिक स्पर्धा

वक्तृत्व प्रथम सृष्टी गुरनुले (कळमेश्वर), द्वितीय रसिका धुर्वे (काटोल), 

वेशभूषा प्रथम आशीष सहानी (सावनेर), अदिती बारई (कुही), द्वितीय गितांश उईके (हिंगणा), नक्कल प्रथम इशिका कोहळे (काटोल), द्वितीय वैष्णवी नागमोते (भिवापूर),

 समूह गीतगायन प्रथम पेठमुक्तापुर शाळा (नरखेड), द्वितीय वलनी माईन (सावनेर), 

कनिष्ठ गट समूह नृत्य प्रथम चिचोली शाळा (नागपूर ग्रामीण), द्वितीय गोठणगाव (कुही), 

वरिष्ठ गट समूह नृत्य प्रथम राजोला शाळा (कुही), द्वितीय लिंगा शाळा (काटोल) यांनी प्राप्त केला.