शिक्षकांना वृक्ष देऊन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा.

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान : –  शहर विकास मंच द्वारे शिक्षकांना वृक्ष देत सत्कार करुन देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधा कृष्णन यांची १३५ वी जयंती निमित्य शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

            मंगळवार (दि.५) सप्टेंबर सायकाळ . च्या दरम्यान ला कन्हान शहर विकास मंच द्वारे देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३५ वी जयंती चे औचित्य साधुन शिक्षक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले. कार्यक्रमास प्रामु ख्याने उपस्थित बळीरामजी दखने हायस्कुलचे सेवानिवृत मुख्याध्यापक मालविय सर, सेवानिवृत मुख्याध्यापिका सौ. विशाखा ठमके मॅडम, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष  शांताराम जळते सर यांच्या हस्ते डॉ सर्वप ल्ली राधाकृष्णन, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

          यावेळी उपस्थित मान्यवरांनी  डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षक दिवसा वर मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवानिवृत मुख्याध्यापिका तसेच, आर्दश हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जी.डी.यादव, शिक्षक शांताराम जळते यांना वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

           कार्यक्रमाचे सूत्र संचालन अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी तर आभार प्रदीप बावने यांनी मानले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच सचिव योगराज आकरे, प्रकाश कुर्वे, आकाश पंडितकर, मनिष शंभर कर, संजय तिवसकर सह मान्यवर नागरिक उपस्थित होते.