Home देशविदेश आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी 14 एप्रिलची जयंती साजरी करू…… — पण,परंपरागत नाही…

आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी 14 एप्रिलची जयंती साजरी करू…… — पण,परंपरागत नाही…

   (1) आम्ही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याकडून पैसे घेणार नाही किंवा त्यांना मंचावर बोलावणार नाही.

       (2) कोणत्याही प्रबोधन करणाऱ्या,शीलासहित विद्या ( विद्या नसली तरी चालेल ) असणाऱ्याच प्रबोधनासाठी केवळ त्याच्या जाण्या येण्याच्या खर्चाव्यतिरिक्त कोणतेही धन न देता केवळ मान देऊनच त्यांना आमंत्रित करणार.

        (3) आजपर्यंत ज्या वक्त्याला ( वरील व्याख्येनुसार ) एकदा बोलावले असेल, त्याला दूसऱ्यांदा कधीही बोलावणार नाही.

       (4) गायकांच्या वेळेपेक्षा प्रबोधन करणाऱ्यांनाच जास्त वेळ देणार. त्याचप्रमाणे वक्त्याने सुद्धा आजपर्यंत श्रोत्यांनी जे ज्ञान घेतले नसेल किंवा ऐकले नसेल असेच ज्ञान स्वतः आचारण करून द्यावे.

        (5) कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांनी ज्या विचारासाठी आणि ध्येयासाठी जीवन समर्पित केले. त्या अर्धवट राहिलेल्या ध्येय आणि विचारांना श्रोते आणि वक्त्याने पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी त्या ( उदा. 14 /4/2026) दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचा दृढ संकल्प करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत करावे.

      (6) डी.जे.किंवा कर्णकर्कश बँड न लावता शांततेत मिरवणूक काढून केवळ बॅनरवर सुरु झालेल्या जागतिक युद्धाचा निषेध करणाऱ्या घोषणाच असल्या पाहिजेत. त्यासाठी महापुरुष आणि तत्ववेत्त्याचे सुविचार त्यावर असले पाहिजेत. कुणालाही मिरवणुकीत मद्यप्राशन करून येऊ देऊ नये.

       (7) कोणत्याही RSS मनुवादी व्यक्तीला केवळ आपल्यास्वार्थासाठी घुसखोरी करू देऊ नये.

        (8) ज्यांनी ज्यांनी संविधानातील आरक्षणाचा लाभ घेऊन अत्यावश्यक, आवश्यक, सुखाच्या, विलासाच्या गरजा भागवल्या अशाच आंबेडकरी अनुयायांनी त्यांच्या कमाईतला विसावा हिस्सा देऊन आर्थिक परिस्थितीने गरीब असणाऱ्या आपल्याच समाजबांधवांचा आर्थिक भार जास्तीत जास्त उचलावा ( परंतू अजिबात उपकाराची भावना न ठेवता ).

       (9) कोणत्याही पाहुण्यांचा सत्कार करताना त्यांना गुलाब पुष्पगुच्छ, बुके शाल न देता ” भारताचे संविधान ” किंवा इतर जागृतीचे कोणतेही महापुरुष लिखित ग्रंथ द्यावे.

       (10) आंबेडकर जयंतीत कुठल्याही प्रकारे ‘RSS मनुवादी ‘ घुसखोरी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी केवळ त्यांच्या आर्थिक प्रबोधनाला बळी पडू नये.

        आवाहनकर्ता

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद 7875452689