शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर – राजकीय कार्यासोबतच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे गोंडपिपरी तालुक्यातील गौतम झाडे यांचे काल पहाटे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षाचे होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गोंडपिपरी अनु.जाती सेलचे तालुकाध्यक्ष होते.
त्यांच्या कार्याची संवेदनशीलता लोकहितोपयोगी असल्याने ते चंद्रपूर जिल्हातंर्गत गोंडपिपरी तालुक्यात लोकप्रिय होत.
त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिवारात शोककळा पसरली असून,कुटुंबाची हानी झाली आहे.



