रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- महिलांचे सामाजिक, सांस्कृतीक बौद्धिक, सेवाभावी व्यासपीठ म्हणजे चिमूर येथील प्रेरणा मैत्री ग्रुप असून दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करीत असतांना दिनांक ८ मार्च २६ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
जागतिक महिला दिनाचे कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी अर्चना लोथे तर उदघाटीका भांगडिया फाउंडेशन च्या संचालिका अपर्णा कीर्तिकुमार भांगडिया उपस्थित राहणार आहे. प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सौं गीता लिंगायत, वैधकीय अधिकारी तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ शुभांगी अगडे, उपस्थित राहणार आहे.
पाककला स्पर्धा (डाळ व तांदूळ वापरून तिखट पदार्थ घरून तयार करून आणणे. कोणतीही डाळ चालेल ) वक्तृत्व स्पर्धा (विषय स्त्री जन्मा तुझी कहाणी ), चिमूर ची हास्यजत्रा स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य स्पर्धाचे आयोजन केलेले आहे.
महिलांच्या विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी व उपस्थित राहण्याचे आवाहन अर्चना लोथे,नितु पोहनकर, कविता वरघणे, नम्रता राचलवार, संध्या चलपे, अर्चना भोपे शिल्पा अढाल, उमा जाधव, जयश्री दानव, धनश्री बिरजे, भावना भोपे, गायत्री झुरमुरे, राधा पुराणिक, वैशाली लखमापुरे यांनी केलेले आहे.


