शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी शुभम पसारकर यांची,”स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत,”स्वच्छता ब्रॅंड ॲम्बेसिडर,म्हणून नियुक्ती केली आहे.
यामुळे शुभम पसारकर यांच्यावर चिमूर नगरपरिषदे अंतर्गत आव्हानात्मक जबाबदारी दिली असल्याने ते सदर जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतात हे येणाऱ्या वर्षभारत कळेलच!…
नियुक्ती पत्रात मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी म्हटले आहे की,”भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ मध्ये आपल्या शहरातील जनमानसात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शहराच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगर परिषद चिमूर तर्फे आपली ‘स्वच्छता ब्रॅंड ॲम्बेसिडर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
आपले सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि जनसंपर्क लक्षात घेता,आपल्या माध्यमातून चिमूर शहरातील नागरिक स्वच्छतेच्या चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतील,अशी आम्हाला खात्री आहे.
आपल्या नियुक्तीनंतरची प्रमुख जबाबदारी….
१) नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत प्रोत्साहित करणे.
२) शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जनजागृती करणे.
३) नगर परिषदेच्या विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे.
४) सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत युवकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
आपल्या निवडीबद्दल नगर परिषद प्रशासन आपले हार्दिक अभिनंदन करत आहे.आपल्या सहकार्यातून ‘चिमूर शहर’ हे या सर्वेक्षणात अव्वल स्थान प्राप्त करेल,असा आम्हाला ठाम विश्वास आहे असा आशावाद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी व्यक्त केला आहे.




