शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
यावेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी संबोधित करताना सांगितले की,या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित राहता आले,हे मी माझे भाग्य समजतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य,त्याग,धर्मनिष्ठा,शिस्त व प्रजाप्रेम येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.अशा स्मारकांमधून आपल्या गौरवशाली संस्कृतीचे व परंपरेचे सातत्याने भान मिळते.
महाराजांच्या पुतळ्यासाठी असलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने हटवून सर्वानुमते,कोणताही विरोध न होता नेरी येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले,ही बाब आजच्या काळात विशेष उल्लेखनीय आहे.या स्मारकाच्या उर्वरित विविध कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले.
हा ऐतिहासिक क्षण पुढील पिढीला शिवरायांच्या धैर्य,पराक्रम,सर्वधर्मसमभाव व प्रजाप्रेमाची सतत आठवण करून देणारा असून शिवभक्तांना नवी ऊर्जा देणारा आहे.
स्मारक उभारणीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या मौलिक कार्याबद्दल शिवजन्मोत्सव कमेटी,श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच नेरी ग्रामवासीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे,माजी आमदार नामदेवराव उसेंडी,नेरी मंडळ प्रमुख मनिषजी तुमपल्लीवार,नगरसेवक संजय नवघडे,सरपंच रेखा पिसे,जि.प. प्रमुख संदिप पिसे,राजेश कांबळे,यशवंतराव कामडी,नानाजी दडमल,संगिता कामडी,माया नन्नावरे (तालुका अध्यक्षा,भाजपा),निखिल पिसे,संगिता वैरागडे,राजेंद्र घोनमोडे,चंद्रभान कामडी,ललिता कडूकार,सरिता जनबंधू,शंकर दडमल,पदश्री नागदेवते,साधना दडमल, विशाल खाटिक तसेच असंख्य शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



