पत्रकार दिनानिमित्त साकोली येथे पत्रकारांचा सोहळा.. — फलकाचे होणार अनावरण.. — ६ जानेवारीला सोहळा..

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली : राज्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी,मानधन विषयी,त्यांच्या कुटुंबीयांना आधार आणि लाभ मिळण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.डी.टी.आंबेगावे यांचा सतत शासनाकडे पाठपुरावा करीत महाराष्ट्रभर लढा सुरू आहे.

          शासनमान्य पत्रकार संघाचे पत्रकारांच्या सोयीसाठी साकोली शहरात शनिवार ०६ जानेवारी २०२४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एकोडी रोड तलाव बायपास रोडवर पत्रकार सेवा संघाच्या जागेवर फलकाचे लोकार्पण,पत्रकारांचा मान्यवरांतर्फे सत्कार आणि जागेचे लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.

         या शोहळ्या प्रसंगी संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथीमध्ये भाजपा भंडारा जिल्हा सचिव ॲड.मनिष कापगते,तालुका कॉंग्रेस अध्यक्ष डॉ.अशोक कापगते,कॉंग्रेस कमिटी साकोली शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर,शेतकरी नेते डॉ. अजयराव तुमसरे,शिवसेना शहरप्रमुख महेश पोगडे,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष जगनराव उईके,राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्षा लताताई द्रुगकर,सामाजिक कार्यकर्ता गजेंद्र लाडे,फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

            या कार्यालयाचा मुख्य उद्देश की,भविष्यात साकोली जिल्हा झाला तर हे मुख्य कार्यालय वृत्तसेवा जगतातील प्रिंट मिडीया,वेबन्यूज मिडीयाच्या मुलाखत घेण्याचे व प्रत्येक बातमी संकलनाचे उपयुक्त शहरातील मध्यवर्ती मिडीया स्टूडियो म्हणून होणार आहे.

         सदर फलकाचे लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे,जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदीवे,जिल्हा सचिव – संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार,तालुका अध्यक्ष निलय झोडे,लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रा.प्रेमानंद हटवार,साकोली शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले,सचिव शेखर ईसापुरे,जि.संपर्क प्रमुख साहिल रामटेके,चेतक हत्तीमारे,मनिषा काशिवार,विर्शी प्रतिनिधी दूर्गेश राऊत,प्रा. ताराचंद कापगते,महाराष्ट्र Live न्यूजचे यशवंत कापगते व भंडारा जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी केले आहे. 

         या नविन उपक्रमाला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.