ग्रीनफ्रेंड्सद्वारे खगोलदर्शन इकोफ्रेंडली कोजागिरीचे अभिनवप्रकारे आयोजन… — निसर्गमहोत्सव कोजागिरी निमित्ताने नेचर पार्कवर वृक्षारोपण… — विदर्भ कोकण बॅंकेने घेतला पुढाकार… — चांद्रबिंबाचे तसेच विविध ग्रह ,नक्षत्र,तारे यांचे घडविले दर्शन…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

  लाखनी:-

   ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे लाखनी निसर्गमहोत्सव व पर्यावरणस्नेही कोजागिरी निमित्ताने खगोलदर्शन कोजागिरी आयोजन तसेच विदर्भ कोकण बँकेतर्फे नेचर पार्कवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

           ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या कार्यालयात लाखनी निसर्गमहोत्सव (श्रावण महिना ते दीपावली सुट्टी पर्यंतच्या काळातील आयोजित उत्सव) खगोलदर्शन कोजागिरीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला नेफडो वन्यजीव समिती भंडारा,अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व नगरपंचायत लाखनी यांचे सहकार्य लाभले.

           ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी संबोधन करताना सांगितले की निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने महराष्ट्रात प्रथमच निसर्गसंकल्पनेवर आधारित चार दिवस ग्रीन गरबा ग्रीन दांडिया तसेच पर्यावरणसमस्या सांगणाऱ्या प्रतिकात्मक रावण प्रतिमेचे दहन केल्यानंतर ह्या आगळ्यावेगळ्या अभिनव अशा पर्यावरणस्नेही खगोलदर्शन कोजागिरीचे आयोजन मागील 13 वर्षांपासून विदर्भात प्रथमच केले जाते अशी माहिती सुद्धा त्यांनी पुरविली.त्याचबरोबर आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी

           नक्षत्रे ,ग्रह ,तारे ,आकाशगंगा,चांद्रबिंब ,इसरोच्या मंगळ, चंद्र,व सूर्य मोहिमा यांची माहिती देणारे चार्ट द्वारे संपूर्ण खगोलचा परिचय करून दिला. तसेच कोजागिरी निमित्ताने केवळ चांद्रबिंबाचा प्रकाश दुधामध्ये घेऊन कोजागिरी साजरी करण्यासोबतच खगोल, ग्रह ,नक्षत्र, तारे ,चंद्र यांचा सुद्धा परिचय करून घ्यावे व विविध ग्रह आणि ग्रहणाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर कराव्या असे आवाहन त्यांनी केले. लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदीप भांडारकर ,ग्रीनफ्रेंड्स अध्यक्ष अशोक वैद्य यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, नितीन निर्वाण,योगेश वंजारी,सलाम बेग,नितीन पटले,अतुल ठोंबरे,राहुल निर्वाण ,करण निर्वाण, प्रा. अर्चना गायधने,,ज्योती वैद्य,ओंकार आगलावे, नायरा वैद्य,आराध्या आगलावे, पल्लवी वैद्य,सुमित्रा गायधने,सुमन आगलावे, पूजा रोडे,जयश्री आगलावे,महेश आगलावे,अर्णव गायधने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यानंतर लगेच त्यांनी दुर्बिणीतून चांद्रबिंब, त्यावरील विवरे,तसेच अनेक गाजलेले वैज्ञानिक यांचे नावाने असंलेले चंद्रावरील भाग ,गुरू ग्रह व त्यांचे चार चंद्र,विविध नक्षत्रे यांचे दर्शन घडविले.त्याचबरोबर ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्यांनी टाकाऊ वस्तुपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा उपस्थितांनी बघितले.

           तत्पुर्वी लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पर्यावरणस्नेही कोजागिरी व ‘स्वच्छता हीच सेवा’च्याअंतर्गत सायंकाळी लाखनी बसस्थानकावरील ‘नेचर पार्क’वर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा लाखनीच्या सहकार्याने ‘स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम’ बँकेशी संबंधित महिला बचत गटांचे 30 महिला सदस्य यांचे सहभागाने राबविण्यात आला.यावेळी बँक व्यवस्थापक धनंजय खंडेरा यांनी थोडक्यात उत्स्फूर्त मार्गदर्शन केले.

            वृक्षारोपणावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने तसेच त्यांचे अर्धांगिनी प्रा. अर्चना गायधने यांचा वाढदिवस एकत्रितपणे वृक्षारोपणाच्यावेळी नेचर पार्कवर तसेच खगोलदर्शन कोजागिरीचेवेळी अनेक उपस्थित महिला बचत गट सदस्य ,बँक कर्मचारी आणि ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी,निसर्गमित्र यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

          कार्यक्रमाचे संचालन अशोक वैद्य तर आभार प्रदर्शन योगेश वंजारी यांनी केले.

           कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, अशोका बिल्डकाँनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नागरीकर,वनौषधी शेती पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी,गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,सेवानिवृत्त महसूल पर्यवेक्षक गोपाल बोरकर,अशोक नंदेश्वर,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर,टोलीराम सार्वे, दिलीप निर्वाण यांनी परिश्रम घेतले