समर्थ महाविद्यालयात संस्कृत शुभेच्छा पत्रक व संख्या पाठांतर स्पर्धा…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

          राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी व्दारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे संस्कृत शुभेच्छा पत्रक व संख्या पाठांतर स्पर्धा संस्कृत विभागाव्दारे संस्कृत संस्कार केंद्राअंतर्गत घेण्यात आली. इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेप्रमाणेच विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अवगत असावी या अनुसंगाने विद्यार्थ्यांना संस्कृतमधून शुभेच्छा कशा दयायच्या व संस्कृत संख्या कशा पाठांतर करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

         या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्रज्ञा दिघोरे,सलोनी दिघोरे व शिवानी पचारे व तन्नु गभणे या विद्यार्थींनीना देण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात ३०/१०/२०२३ ‘संस्कृत संख्या पाठांतर स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेचा मुख्य उद्येश संस्कृत संख्यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे हा होता.

         या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकिता मेश्राम (B.A.II) द्वितीय क्रमांक योगेश्री मेश्राम (B.A.II.) व तृतीय क्रमांक हिमानी पटले (B.A.I) या विद्यार्थीनींना देण्यात आला. या स्पर्धेचे परिक्षण प्रा स्मिता गजभिये व प्रा. रूपाली खेडीकर यांनी केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी मार्गदर्शन केले असून या दोन्ही स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे आयोजन संस्कृत विभागात कार्यरत प्रा. रूपाली खेडीकर यांनी केले होते.