टेकेपार/ माडगी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक चेटूले यांचा निरोप समारंभ…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

धारगाव: धारगाव क्षेत्रातील ग्रामपंचायत टेकेपार/ माडगी येथे आज दिनांक 4/7/2023 रोज मंगळवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात श्री. पी. एन. चेटुले ग्रामसेवक यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

     ग्रामसेवक प्रदीप चेटूले ह्यांच्या कडे टेकेपार व खुटसावरी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक पदाचा भार होता. आता त्यांनी लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत कवलेवाडा येथे बदली केली. त्यांना अनेक उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार सुद्धा मिळालेत, त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहीला असून आता पर्यंतच्या इतिहासात अतिशय चांगले ग्रामसेवक म्हणून गावात स्तुत्य आहेत. त्यांच्या जाण्याने गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        यावेळी सौ.स्मिता चवळे सरपंच ग्रा.प.टेकेपार यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ करण्यात आला त्यामध्ये विशेष अतिथी म्हणून श्री. केवळरामजी मने माजी सरपंच तसेच श्री गणेशजी चेटुले माजी सरपंच तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री इरफान पटेल उपसरपंच ग्रा. प. टेकेपार, श्री. संदीप खंडाते उपसरपंच ग्रा. प. खुटसावरी सौ. ज्योती नंदेश्वर सदस्य ग्रा. प. खुटसावरी, सौ. प्रियंका सार्वे सदस्य ग्रा. प. खुटसावरी, श्री. देवानंदजी नंदेश्वर लोकमत पत्रकार, श्री उत्तम शिडामे ग्रा. प. सदस्य, सौ. वर्षा भुते ग्रा. प. सदस्य, सौ. देवांगना शेंडे ग्रा.प. सदस्य, श्री वामनजी शेंडे, श्री महेंद्रजी तिरपुडे, श्री अमरजी तिरपुडे, श्री विजय कायते, श्री डी.एस.जवंजार कृषी सहाय्यक, श्री एस. आर. बावनकुळे मुख्यध्यापक जि. प.प्राथमिक शाळा टेकेपार श्री. भोंगाडे सर सहाय्यक शिक्षक जि. प.प्राथमिक शाळा टेकेपार श्री. शिशुपाल चेटूले शाळा समिती अध्यक्ष सौ. रसिका गिदमारे अंगणवाडी सेविका कु. अस्मिता रामटेके अंगणवाडी सेविका तसेच श्री शरद कायते ग्रा.प.कर्मचारी श्री. राजु फेंडर डाटा ऑपरेटर, श्री. रामकृष्ण परसराम डोये रोजगार सेवक , श्री. क्रिष्णा सूर्यवंशी, श्री विजय फेंडर, श्री सुनील डोये, जि. प.प्राथमिक शाळा टेकेपार येथिल सर्व विद्यार्थी व गावातील उपस्थित सर्व नागरिक यांच्या प्रमुख उपस्थित निरोप समारंभाचे कार्यक्रम पार पाडले.

        मनोगत

गावात सर्वाशी ते जुळवून घेत होते, गावाच्या विकासासाठी ग्रामसेवक चेटूले साहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावाला वाईट वाटत आहे.

– इरफान पटेल, उपसरपंच, ग्रामपंचायत टेकेपार/ माडगी